Coronavirus Impact : पूर्व आशिया आणि पॅसिफिकमधील सुमारे 1 कोटी 10 लाख लोक होऊ शकतात ‘गरीब’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   जागतिक बँकेने म्हटले आहे की कोरोना विषाणूमुळे पूर्व आशिया आणि पॅसिफिक प्रदेशातील सुमारे 1 कोटी 10 लाख लोक गरिबीला सामोरे जाऊ शकतात. या विषाणूमुळे जगभरात 780,000 हून अधिक लोक संक्रमित झाले आहेत आणि 37,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

वॉशिंग्टन स्थित ग्लोबल लेन्डरने सोमवारी जाहीर केलेल्या अहवालात म्हटले आहे की पूर्वीचा अंदाज होता की 2020 मध्ये पूर्व आशिया आणि पॅसिफिक प्रदेशातील जवळपास 3 कोटी 50 लाख लोक गरीबीवर मात करू शकतील, ज्यात एकट्या चीनमध्ये 2.5 कोटी पेक्षा अधिक लोक समाविष्ट आहेत.

एप्रिल 2020 मध्ये पूर्व आशियातील आर्थिक अपडेट आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेच्या वार्षिक बैठकीपूर्वी असे म्हटले होते की जर आर्थिक परिस्थिती आणखी खालावली तर गरिबीचा सामना 1 कोटी 10 लाख पेक्षा अधिक लोकांना करावा लागेल.

चीनमध्ये 2020 मध्ये पायाभूत वाढीचा दर 2.3 टक्क्यांनी घसरण्याचा आणि खालच्या बाबतीत 0.1 टक्क्यांनी घसरण्याचा अंदाज आहे. 2019 मध्ये ते 6.1 टक्के होते. या अहवालात असे म्हटले आहे की आर्थिक बाजाराचा ताण होण्याचा धोका जास्त असेल. अहवालानुसार कोविड -19 चा गरीबीवर गंभीर परिणाम होईल.

तसेच या अहवालात असे म्हटले आहे की कोविड -19 या साथीच्या आजाराचा आणखी बराच काळ प्रसार होत राहिला तर पर्यटनावर आणखी नकारात्मक परिणाम होईल. त्यामुळे हे प्रमाण अजून वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.