‘2 दिवसांसाठी दिल्ली पोलिसांना आमच्याकडे द्या, निर्भयाच्या गुन्हेगारांना फाशीवर चढवू’, ‘आप’च्या सिसोदियांनी सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भया प्रकरणात दोषींना फाशी देण्याच्या प्रकरणात भाजप शासित केंद्र सरकार आणि दिल्ली आम आदमी पार्टीमध्ये वाद सुरु झाला आहे. दोन्ही पक्षांचे नेते एक दुसऱ्यांवर निर्भया प्रकरणात दोषींना फाशी देण्यास उशीर होत असल्याचा आरोप लावत आहेत.

या दरम्यान उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियाने केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला. गुरुवारी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिल्ली सरकारमुळे उशीर झाल्याचा आरोप लावला आहे, ज्यामुळे आता मनीष सिसोदिया भाजपवर हल्लाबोल करत आहेत.

सिसोदिया म्हणाले की, दुख झाले की केंद्रातील एक वरिष्ठ नेता संवेदनशील प्रकरणावर खोटे बोलत आहेत. पोलीस तुमचे, कायदा सुव्यवस्था तुमची, तिहारचे डीजी तुमचे, त्यानंतर प्रश्न आम्हाला. मला माहित आहे की तुमच्याकडे मुद्दा नाही, परंतु इतके खोटे बोलू नका. पुढे मनिष सुसोदिया म्हणाले की दिल्ली पोलिस दोन दिवस आमच्याकडे देऊन पहा, निर्भयांच्या दोषींना फासावर चढवतो.

उशीर होण्यास भाजप जबाबदार – संजय सिंह

आपचे दिल्ली निवडणूक प्रभारी आणि खासदार संजय सिंह यांनी भाजपवर हल्लाबोल केला, ते म्हणाले की सर्वांना माहिती आहे की दिल्ली पोलीस भाजप आणि केंद्राच्या हातात आहे. फाशीला उशीर होण्यास भाजप जबाबदार आहे. केंद्रीय मंत्र्यांनी माफी मागितली पाहिजे. दिल्ली सरकारने दया याचिका काही तासात रद्द करण्यात आली होती. दिल्ली सरकारचा पोलिसांशी काही संबंध नाही.

संजय सिंह म्हणाले की तिहार जेलमध्ये अपॉइंटमेंट नायब राज्यपालांनी केली तर दिल्ली सरकार यामागे कशी असेल. निर्भयांच्या आरोपींना फाशी देण्यासाठी भाजप सरकार जबाबदार आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like