Acharya Tushar Bhosale | ‘इटालियन डोहाळे लागल्यामुळे शिवसेनेकडून राम मंदिराची बदनामी’ (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  इटालियन (Italian) डोहाळे लागल्यामुळे शिवसेनेकडून (Shivsena) राम मंदिराची बदनामी (Ram Mandir Defamation) सुरु आहे. विश्वास नसेल तर राम मंदिराला दिलेलं एक कोटीचे दान (Donation) परत घ्यावं, असं आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष (State President of Spiritual Lead) आचार्य तुषार भोसले (Acharya Tushar Bhosale) यांनी म्हटलं आहे. अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिरा साठी खरेदी करण्यात आलेल्या जमिनीवरून (Land) कथित भ्रष्टाचारावरुन (corruption) शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी केलेल्या टीकेला भोसले यांनी प्रतिउत्तर दिलं आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

शिवसेनेला इटालियन डोहाळे

शिवसेनेला इटालियन डोहाळे लागल्यामुळे आज ते राम मंदिराचीही बदनामी करत आहेत.
कोणतीही अधिकृत माहिती (Official information) न घेता संजय राऊत यांनी राममंदिराची बदनामी चालवली आहे,  असा आरोप यावेळी त्यांनी केला.
शिवसेनेला विश्वास नसेल तर राम मंदिराला दिलेलं एक कोटीचं दान परत घ्यावं पण राम मंदिराची बदनामी करु नये, असं आचार्य तुषार भोसले म्हणाले (Acharya Tushar Bhosale) आहेत.
तसेच ट्रस्टने (Trust) पारदर्शक आणि बाजारभावानेच (Transparent and market price) व्यवहार केला असल्याचंही ते म्हणाले आहेत.

Royal Enfield | 45 हजार रुपयांच्या बजेटमध्ये घरी आणा बुलेट, कंपनीचा आहे हा प्लॅन

मोहन भागवत यांनी खुलासा करावा

दरम्यान, शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी यासंबंधी भाष्य करत संताप व्यक्त केला आहे.
तसेच याबाबत ट्रस्टसह सरसंघचालक मोहन भागवत Sarsanghchalak Mohan Bhagwat) यांनीही खुलासा करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
अयोध्येतील राम मंदिरासाठी खरेदी करण्यात आलेल्या जमिनीवरून भ्रष्टाचाराचा आरोप होत असल्याने वाद निर्माण झाला आहे.
10 मिनिटांपूर्वी दोन कोटींना घेतलेली जमीन श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने (Shri Ram Janmabhoomi Shrine Area Trust) 18.5 कोटींना विकत घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ट्रस्टकडून हे आरोप फेटाळण्यात (Rejected) आले असून दुसरीकडे सीबीआय (CBI) आणि ईडीकडून (ED) चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

 

आमच्या श्रद्धेला ठेच लागली

उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) नेतृत्वात आम्ही अयोध्येला गेलो तेव्हा राम मंदिराचं काम सुरु होतं.
उद्धव ठाकरें नी त्यावेळी आपल्यातर्फे एक कोटींची रक्कम दिली होती.
राम मंदिराच्या नावे देशभरातून निधी (Fund) गोळा करण्यात आला.
संपूर्ण जगातून शेकडो कोटींचा निधी राम मंदिरासाठी लोकांनी दिला आहे.
प्रभू श्रीराम (Lord Shriram) यांच्या नावे एका पैशाचाही घोटाळा झाला नाही पाहिजे.
पण जे जमिनीचं प्रकरण समोर आलं आहे त्यामुळे आमच्या श्रद्धेला ठेच लागली आहे.
श्रद्धेतून गोळा झालेल्या पैशांचा गैरवापर होत असेल तर त्याला काही अर्थच राहणार नाही, असा संताप संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

 … पण त्याचं राजकारण केलं

जर हा घोटाळा झाला असेल तर ट्रस्टच्या प्रमुखांनी सर्वांसमोर येऊन शंका दूर केली पाहिजे.
सरकारच्या वतीने तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी खुलासा करावा.
विश्व हिंदू परिषदेच्या (Vishwa Hindu Parishad) नेत्यांनी खुलासा करणं गरजेचं आहे.
अयोध्येसाठी लढा देणाऱ्या आमच्यासारख्यांना नेमकं काय झालं आहे हे कळणं गरजेचं आहे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

अयोध्या आमच्या श्रद्धा आणि आस्थेचा विषय

आपचे खासदार संजय सिंग (AAP Mp Sanjay Singh) यांनी माझ्याशी फोनवरुन चर्चा करुन माहिती दिली.
प्रभू श्रीराम आणि अयोध्या आमच्या श्रद्धा आणि आस्थेचा विषय आहे.
काही जणांनी त्याचं राजकारण (Politics) केलं असेल पण आम्ही नाही.
ट्रस्टचे सर्व सदस्य भाजप सरकारच्या (BJP government) वतीने नेमण्यात आले आहेत.
आमच्यासारख्या संघटनेचाही सदस्य असावा असं आम्ही सांगत होतं.
पण त्यांनी तसं केलं नाही, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.

 

Web Title : bjp acharya tushar bhosale shivsena mp sanjay raut on ram temple trust accusation of land scam

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Dream House | PNB कडून स्वस्तात घर खरेदीची संधी; 12,865 घरं आणि अ‍ॅग्रीकल्चर प्रापर्टीची विक्री, जाणून घ्या सविस्तर