मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – BJP – Ajit Pawar NCP – Mahayuti | लोकसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) असा सामना झाला होता. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार महायुती सरकारमध्ये (Mahayuti Govt) सहभागी झाले. त्याअगोदर शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपची साथ देत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली (Shivsena Shinde Group). त्यानंतर भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट मिळून महाविकास आघाडीला आव्हान देण्यात आले.
मात्र मतदारांनी महायुतीला नाकारले. अजित पवार हे महायुतीत सहभागी झाल्याने लोकसभेला फटका बसला का? याबाबत मतमतांतरे आहेत. मात्र संघाकडून अजित पवारांच्या महायुतीतील सहभागावर प्रश्न उपस्थित करीत भाजपाला खडेबोल सुनावण्यात आले होते. महायुतीतील अजित पवारांचा सहभाग आणि लोकसभा निवडणुकीवर त्याचा झालेला परिणाम यावर भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केले आहे.(BJP – Ajit Pawar NCP – Mahayuti)
लोकसभा निवडणुकीत महायुतीची सर्व सूत्रे केंद्रातून नियंत्रित होती. निकालावर आमच्या कोअर कमिटीतही चर्चा झाली. कारणांचा आढावा घेतला गेला. मतदारांनी का नाकारले हा खूप मोठा विषय आहे. वरिष्ठांनी त्यावर मंथन केले आहे. त्याचे मुद्देही काढले आहेत.तीन पक्षांचे महायुतीचे सरकार झाल्यामुळे असा निकाल लागला का यावर अनेकांनी मतमतांतरे आहेत.
मात्र अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष हा महायुतीत आल्याने ३५-४० विधानसभा मतदारसंघ आणि ५-६ लोकसभा मतदारसंघावर परिणाम झाला जिथं भाजपाची ताकद होती असा दावा भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांनी केला आहे.
हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) म्हणाले की, अजित पवारांसोबत आलेले आमदार आणि भाजपाचे तिथले उमेदवार यांच्यात बहुतांश ठिकाणी संघर्ष झालेला आहे.
काही मतदारसंघात शिवसेनेशी संघर्ष असेल परंतु सर्वाधिक संघर्ष राष्ट्रवादीशी झाला.
राष्ट्रवादीचे २०१९ मध्ये जे ५३ आमदार निवडून आले होते त्यातील बहुतांश पश्चिम महाराष्ट्रातील होते.
त्यात पुणे जिल्ह्यात ११ आमदार होते. त्यामुळे सहाजिकच तिथे लढत भाजपाशी झाली.
त्यामुळे लोकसभा निवडणुकीतला हा फॅक्टर इतका दिसून आला नाही मात्र विधानसभा निवडणुकीत आमच्या नेत्यांना
याचा विचार गांभीर्याने करावाच लागणार आहे असं त्यांनी सांगितले.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
पोलीसनामाच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/policenamaa
हे देखील वाचा