शरद पवारांच्या भर पावसात झालेल्या सातार्‍याच्या सभेबद्दल भाजपाकडून अतिशय ‘गंभीर’ आरोप (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुसळधार पावसात सातारा इथं सभा घेऊन संपूर्ण राज्याचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. सोशल मीडियावर शरद पवारांच्या पावसात सभा घेतानाचे फोटो मोठ्याप्रमाणात सोशल मीडियात व्हायरल झाले. शेवटच्या टप्प्यात शरद पवारांच्या या सभेची राज्यात मोठी चर्चा झाली. कारण सभेत शरद पवार यांनी कोसळणारा पाऊस अंगावर घेत आपण अजूनही खंबीर असल्याचे दाखवून दिले. मात्र, शरद पवारांच्या याच सभेबाबत भाजपने गंभीर आरोप केला आहे.

शरद पवार हे भर पावसात भाषण देताना लोक उभी होती, कारण राष्ट्रवादीने त्यांच्यावर पैशाचा पाऊस पाडला होता. ही बघा कालच्या भ्रष्टवादीच्या सभेची पोल खोल. कितीही भावनिक राजकारण केलं तरी शेवटी तुमचं पितळ उघडं पडणारच, असे म्हणत भाजपने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
निवडणूक प्रचाराची सांगता होत असाना भाजपने राष्ट्रवादीवर हा गंभीर आरोप केला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती लोकं सभेच्या ठिकाणी का उभी राहिली होती हे सांगत आहे. तसेच या लोकांना किती पैसे देण्यात आले हे देखील सांगताना दिसत आहे. हा व्हिडीओ भाजपच्या अधिकृत अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.

Visit : Policenama.com