शिवसेनेच्या आमदाराला भाजपकडून 50 कोटींची ‘ऑफर’, ‘या’ नेत्याचा ‘खळबळजनक’ आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी काल भाजपवर फोडाफोडीचे राजकारण करत असल्याचा आरोप लावल्यानतंर आता पुन्हा एकदा भाजपवर असाच खळबळजनक आरोप लावला आहे. शिवसेनेच्या एका आमदाराला फोडण्यासाठी भाजपने 50 कोटी रुपयांची ऑफर दिली जात आहे. वडेट्टीवार यांनी ही माहिती दिल्यानंतर राजकीय वर्तुळात विरोधीपक्षात खळबळ उडाली आहे. त्यामुळे पक्षाने आता अधिक सावध पवित्रा घेतला आहे. परंतू आमचा कोणताही आमदार फुटणार नसल्याचा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांनीही आपल्याला फोन आल्याची माहिती एका मुलाखतीत दिली आहे. आपल्याला काही कार्यकर्त्यांचे फोन आले, काही कार्यकर्ते आपल्या घरी देखील आले. मात्र मी घरी न थांबता बाहेर निघून गेलो. हे कोण कार्यकर्ते होते आणि ते कशासाठी आले असतील याचा अंदाज सर्वांनाच आहे असे सांगत भाजपने आपले मन वळवण्याचा प्रयत्न केल्याचे खोसकर यांनी अप्रत्यक्षपणे सांगितले.

वडेट्टीवार म्हणाले की, अशा प्रकारे भारतीय जनता पक्षाकडून जर कोणत्याही आमदाराला फोडण्यासाठी फोन आले, तर ते सर्व फोन टॅप करावेत, त्यांच्याविरोधात पुरावे गोळा करुन त्यांना उघडे पाडावे अशा सूचना आम्ही सर्व आमदारांना दिल्या आहेत. आमचे आमदार राज्यातच सुरक्षित असून कुणालाही जयपूरला पाठवले नाही असे देखील वडेट्टीवार यांनी सांगितले आहे. जे आमदार जयपूरला गेले असतील, ते व्यक्तिगतरित्या आपल्या कुटुंबीयांसह फिरायला गेले असतील. निवडणुकीच्या काळात सर्वजण थकले असल्याने ते फिरण्यासाठी गेले असतील असे मत वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.

वडेट्टीवार म्हणाले, भाजने निवडणूकीपूर्वीच फोडाफोडीचे राजकारण सुरु केले होते. परंतू आमचा कोणताही आमदार फुटणार नाही, जरी फुटले तरी त्यांच्या विरोधात आम्ही सर्व सहमतीने एक आमदार उभा करु आणि त्याला पाडून राजकारणातून हद्दपार करु. हे आम्ही विरोधी पक्षांनी ठरवले असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

जनतेने भाजपला सर्वात जास्त जागा दिल्या तरी भाजप सत्ता स्थापन का करत नाही असा सवाल वडेट्टीवार यांनी भाजपला केला. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली तर त्याला भाजप जबाबदार असेल असे देखील वडेट्टीवार म्हणाले.

Visit : Policenama.com

तुमच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे सुद्धा होऊ शकतो ‘मायग्रेन’ चा त्रास
भेसळयुक्त ‘कुंकू’ वापरले तर होऊ शकतात ‘गंभीर’ परिणाम, जाणून घ्या
शरीरयष्टी किरकोळ असेल तर ‘हे’ 6 पदार्थ खा, दिसाल सेलिब्रिटींसारखे फिट
चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी करा ‘हे’ 5 घरगुती आणि सोपे उपाय, जाणून घ्या
चुकीनही करू नका ‘यो यो डाएट’, बिघडू शकते तब्येत, जाणून घ्या
‘जंक फूड’ खाण्याची सवय सोडविण्यासाठी ‘हे’ 5 खास उपाय, जाणून घ्या
सावधान ! प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय ? जाणून घ्या धोके

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like