Pune : मित्रपक्षाने केली बंडखोरी अन् भाजपची डोकेदुखी वाढवली ! रयत क्रांतीकडून प्रा. चौगुले यांनी भरला अर्ज

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे पदवीधर निवडणुकीत (Pune Graduate Constituency) भाजपकडून संग्राम देशमुख ( sangram deshmukh ) यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र, भाजपचा मित्रपक्ष असलेल्या रयत क्रांती संघटनेने (rayat-kranti-sanghtana) या निवडणुकीत वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतला आहे. रयत क्रांती संघटनेकडून पुणे पदवीधर निवडणुकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी प्रा. एन. डी. चौगुले ( N.D Chougule ) यांनी उमेदवारी अर्ज दाखल (filed-nomination) केला आहे. त्यामुळे भाजप उमेदवार संग्राम देशमुख यांची डोकेदुखी वाढणार आहे.

राष्ट्रवादीकडून अरुण लाड यांना अधिकृत उमेदवारी घोषित झालेली आहे. मात्र, राष्ट्रवादीच्या भैया माने यांनीही निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे भैया माने अर्ज मागे घेणार की राष्ट्रवादीला पुन्हा बंडखोरीचा फटका बसणार हे आगामी काळात ठरेल, तुर्तास सदाभाऊ खोत यांच्या संघटनेच्या उमेदवाराने अर्ज भरल्याने भाजप खोत यांची समजूत काढणार का ? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पदवीधर निवडणुकीसाठीचे मतदान 1 डिसेंबरला होणार आहे.

शिक्षक ते संस्थाचालक असा प्रा. चौगुले यांचा प्रवास
प्रा. एन.डी. चौगुले हे कोल्हापूर आणि सोलापूर या दोन जिल्ह्यांत विस्तारलेल्या सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ माळवाडी कोतोली, ता. पन्हाळा या संस्थेचे अध्यक्ष असून, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कार्यकारी परिषद सदस्य म्हणून काम करत आहेत. महाविद्यालयीन शिक्षणाच्या काळात ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडे आकर्षित झाले. परिषदेच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांसाठी भरपूर काम केले. अनेक वादविवाद स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा गाजविल्या. पुढे इंग्रजी विषयातून एम.ए. बीएड या पदव्या संपादन केल्या आणि ते शिक्षक बनले. शिक्षण क्षेत्रातील उमेदवारीच्या काळामध्ये त्यांनी अनेक विनाअनुदानित शिक्षण संस्थांमध्ये शिक्षक म्हणून इमानेइतबारे नोकरी केली. एक शिक्षक ते संस्थाचालक असा त्यांचा प्रवास आहे.