धर्माच्या नावाखाली भेदभाव नको ! मुस्लिमांनाही नागरिकत्व द्या, NDA मधील भाजपच्या मित्र पक्षांची मागणी

चंदिगड : पोलीसनामा ऑनलाइन – आसाम गण परिषदेनं सुधारित नागरिकत्व कायदा प्रकरणात यू-टर्न घेतल्यानंतर आता भाजपच्या आणखी एका मित्रपक्षाने घूमजाव केले आहे. नव्या कायद्यात मस्लिमांचा देखील समावेश करा, अशी मागणी पंजाबमधील भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलानं केली आहे. भारत हा धर्मनिरपेक्ष देश असल्याने नव्या कायद्यातून मुस्लिमांना वगळणं योग्य ठरणार नाही, अशी भूमिका शिरोमणी अकाली दलानं घेतली आहे.

सुधारित नागरिकत्व विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर झाल्यानंतर त्यावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली. त्यामुळे त्या विधेयकाला कायद्याचं स्वरूप प्राप्त झाले आहे. अकाली दलाचे सचिव आणि प्रवक्ते दलजित सिंग चीमा यांनी त्याचे स्वागत केले. त्यामुळे अनेक अल्पसंख्यांकाना भारताचे नागरिकत्व मिळेल आणि त्यांचे जीवन सुखकर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. याच बरोबर त्यांनी नव्या कायद्याचा लाभ मुस्लिम समुदायालादेखील मिळावा अशी मागणी केली.

चीमा म्हणाले, पाकिस्तान, बांग्लादेश, अफगाणिस्तानातून भारतात आलेल्या हिंदू, बौद्ध, शीख, जैन, पारशी आणि ख्रिश्चन धार्मीय स्थलांतरितांना अनेक वर्षापासून भारताचे नागरिकत्व मिळाले नव्हते. आपल्या देशातून अत्याचारांना कंटाळून ते भारतात आले. त्यांना सोयी सुविधांपासून वंचित रहावे लागतय. केंद्र सरकाने नागरिकत्व कायद्याला मंजुरी करून त्यांना नवे आयुष्य दिले आहे. मात्र, यात मुस्लिमांचा समावेश करण्यात आलेला नाही. मुस्लिमांनादेखील सुधारित नागरिकत्व कायद्यात समावेश करण्यात यावा, अशी मागणी चीमा यांनी केली. तसेच आमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/