महायुतीचा धर्म न पाळता पिंपरीतून भाजपाचे अमित गोरखे यांची ‘बंडखोरी’ !

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात शिवसेना-भाजप आणि मित्र पक्षांची महायुती झालेली आहे. यातून पिंपरी मतदार संघ हा शिवसेनेच्या वाट्याला गेला आहे. मात्र पिंपरी विधानसभेतून भारतीय जनता पक्षाचे अमित गोरखे यांनी बंडखोरी केली आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष असलेल्या गोरखे यांनी शिवसेनेचे उमेदवार गौतम चाबुकस्वार यांच्या विरोधात अपक्ष अर्ज दाखल केल्याने अडचणीत वाढ झाली आहे.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे पिंपरी विधानसभेतून भाजपाकडून तीव्र इच्छुक होते. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून त्यांनी संपूर्ण मतदारसंघात त्यानुसार जोरदार मोर्चेबांधणी केली होती. मात्र महायुतीत ही जागा शिवसेनेला सोडण्यात आल्याने त्यांनी आज बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला. पिंपरी विधानसभेतून त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत थेट महायुतीच्याच उमेदवाराला आव्हान दिले आहे.

यावेळी त्यांच्यासोबत भाजपाचे नगरसेवक उपस्थित असल्यामुळे त्यांच्या बंडखोरीला मुख्यमंत्र्यांचे पाठबळ असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. आता अमित गोरखे आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवणार की माघार घेणार हे (दि. ७ सोमवारी) स्पष्ट होईल. परंतु तूर्तास तरी गोरखे यांची बंडखोरीने शिवसेनेची डोकेदुखी वाढवणारी आहे असचं म्हणावे लागेल.

Visit : Policenama.com