अमित शाह ते अखिलेश यादव यांच्यापर्यंत, जाणून घ्या कोण आहेत देशातील तमाम लोकप्रिय राजकीय नेत्यांचे सासरे

0
33
file photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील अनेक राजकीय नेते असे आहेत, जे लोकांमध्ये केवळ आपल्या राजकारणामुळेच नव्हे, तर आपल्या पर्सनल लाइफमुळे सुद्धा चर्चेचा विषय होत असतात. जाणून घेवूयात कोण आहेत या लोकप्रिय नेत्यांच्या पत्नी आणि त्यांचे सासरे…

राजद अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचा विवाह राबडी देवी यांच्याशी 1973 मध्ये झाला होता. राबडी देवी यांच्या वडीलांचे नाव शिवप्रसाद चौधरी आहे. लालू यांचे सासरे खुप श्रीमंत होते. या विवाहाच्या वेळी त्यांच्याकडे खुप प्रॉपर्टी आणि शेतीवाडी होती.

अखिलेश यादव यांनी 1999 मध्ये डिम्पल यांच्याशी लग्न केले. डिम्पल राजपूत कुटुंबातील आहेत, त्यांच्या वडीलांचे नाव एससी रावत आहे. अखिलेश यांचे सासरे आर्मीत कर्नल होते.

बिहारचे सीएम नीतीश कुमार यांचा विवाह मंजू कुमारी सिन्हा यांच्याशी झाला होता. नीतीश कुमार यांच्या सासर्‍यांचे नाव स्व. कृष्णा नंद सिन्हा आहे. ते पाटणामध्ये हायस्कूल शिक्षक होते. कृष्णा नंद सिन्हा एक हुशार शिक्षक म्हणून ओळखले जात.

अमित शाह यांचा विवाह 1987मध्ये कोल्हापुरच्या सोनल यांच्याशी झाला. सोनल शाह यांनी कोल्हापुरच्या पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमधून शिक्षण घेतले. अमित शाह यांचे सासरे म्हणजे सोनल शाह यांच्या वडीलांची कोल्हापुरातच शेती होती.

राजनाथ सिंह यांचे पुत्र पंकज सिंह युपीच्या नोएडाचे आमदार आहेत. पंकज सिंह यांच्या पत्नी सुषमा इंटरनॅशनल लेव्हलच्या शूटर आहेत. तर पंकज सिंह यांच्या सासर्‍याचे नाव नारायण सिंह राणा आहे. राणा उत्तराखंडातील राजकारणात आहेत.

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अबदुल्ला यांनी 1994 मध्ये दिल्लीच्या पायल यांच्याशी विवाह केला होता. पायल यांचे वडील रामनाथ हे आर्मीमध्ये मेजर जनरल होते. 2011मध्ये पायल आणि उमर यांचा तलाक झाला आहे.