2 वर्षात भाजपने ‘गमावली’ 6 राज्यातील ‘सत्ता’, दिल्लीने वाढली भाजपची ‘धाकधूक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली विधानसभेत आपने हॅट्रिक करत आक्रमक पवित्रा घेत मैदानात उतरलेल्या भाजपच्या मोठा पराभव केला. दिल्लीच्या या निकालाने भाजपचा धाकधूक वाढली आहे. राजधानी दिल्लीची चावी भाजप आपल्या ताब्यात घेऊ इच्छित होती मात्र त्यात त्यांना अपयश आले. एवढेच नाही तर भाजपला 10 जागांवर देखील विजय मिळवता आला नाही. भाजपने फक्त 8 जागावंर विजय मिळवला. हरियाणात भाजपला कसे बसे सत्तेत येता आले मात्र इतर राज्यातून भाजपला माघार घ्यावी लागली.

जर मागील दोन वर्षांचा विचार केला गेला तर भाजप आणि एनडीएच्या ताब्यात असलेली 6 राज्ये एक एक करुन भाजप मुक्त झाली. लोकसभा निवडणूकी पूर्वी 4 राज्यात निवडणूका झाल्या. त्यात मध्यप्रदेश, राज्यस्थान, छत्तीसगड आणि मिझोरम या राज्याचा समावेश होता. यातील मध्यप्रदेश राजस्थान आणि छत्तीसगड ही राज्य भाजपच्या हातून निसटली. लोकसभा निवडणूक आणखी एक राज्य भाजप, एनडीएतून बाहेर पडले. आंध्र प्रदेशात भाजप तेलगू देसम सोबत सत्तेत होती परंतु निवडणूकीपूर्व टीडीपीने भाजपची साथ सोडली. विधानसभा निवडणूक भाजपसह टीडीपीला देखील आपली सत्ता गमवावी लागली.

लोकसभा निवडणूकीनंतर महाराष्ट्र आणि हरियाणात भाजपाला विजय तर मिळाला मात्र त्यांना झारखंडवर पाणी सोडावे लागले. तर महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येऊनही भाजपला विरोधी बाकावर बसावे लागले. अशा प्रकारे भाजपने एका पाठोपाठ एक असे 6 राज्य गमवाली.

दिल्लीत भाजपला पुन्हा एका पराभवाचा सामना करावा लागला. देशाची राजधानी दिल्ली असल्याने येथे पराभव झाल्याचा परिणाम भाजपला इतर राज्यात सोसावा लागू शकतो. दिल्लीत आम आदमी पार्टीने पुन्हा एकदा 62 जागांवर विजय मिळवत भाजपचा मोठा पराभव केला आणि दिल्लीची चावी आपल्याच ताब्यात ठेवली. जर 2017 सालचा विचार केला तर डिसेंबर 2017 सालापर्यंत भाजप आणि त्यांच्या सहयोगी पक्षांची 19 राज्यात सत्ता होती.