भाजप व मित्र पक्षाकडून प्रभारी पोलिस निरीक्षक बालाजी तीप्पलवाड यांच्यावर कारवाईची मागणी

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन –   ऑगस्ट रोजी निवेदन देण्यासाठी गेलेल्या पाथरी येथील वंचित बहुजन आघाडी कार्यकर्त्यांचा अपमान केल्याबद्दल प्रभारी पोलिस निरीक्षक बालाजी तीप्पलवाड यांच्या विरुद्ध सर्वस्तरातून योग्य ती कारवाई ची मागणी होत आहे. भाजप व मित्र पक्षाच्यावतीने 10 ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयाला निवेदन देण्यात आले आहे. प्रभारी पोलीस निरीक्षकांकडून अपशब्द व आपमान करणाऱ्या भूमिकेवर प्रश्न विचारला जात असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जावी या मागणीचे निवेदन तहसीलदार बीएस कट्टे यांना देण्यात आले आहे. यापूर्वीच तहसील प्रशासनाला संबंधित कार्यालयाकडून योग्य ती कारवाई व्हावी अशा मागणीचे निवेदन देण्यात आले होते. परंतु अद्याप प्रभारी पोलिस निरीक्षक बालाजी तीप्पलवाड यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही.

अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांना पाठीशी न घालता त्यांच्यावर ठोस कारवाई व्हावी अन्यथा भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षांकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे. भाजप मित्र पक्षाच्यावतीने घडलेल्या प्रकाराचा निषेध करण्यात आला. पाथरी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून थेट तहसील कार्यालय येथे निवेदन देण्यासाठी भाजप व मित्र पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तहसील कार्यालयात पोहोचले. निवेदनावर भाजपा पदाधिकारी संतोष सावळाराम जोगदंड यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.