महापौर पदासाठी मुरलीधर मोहोळ तर उपमहापौर पदासाठी सरस्वती शेंडगे यांची नावे भाजपाकडून जाहीर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महानगरपालिकेत भाजपाकडून महापौर पदासाठी मुरलीधर मोहोळ तर उपमहापौर पदासाठी सरस्वती शेंडगे यांची नावे भाजपाच्या शहराध्यक्ष आमदार माधरी मिसाळ यांनी जाहीर केली आहेत. दोन्ही पदे एक-एक वर्षासाठी राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

कोथरूड विधानसभा मतदारसंघासाठी मोहोळ यांना डावलण्यात आले होते. पक्ष श्रेष्ठींनी कोथरूडमधून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली होती. आता मोहोळ यांचा पुण्याचा प्रथम नागरिक होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मोहोळ हे यापुर्वी स्थायी समितीचे अध्यक्ष देखील होते. पुण्याच्या नवीन महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी आज अर्ज भरण्यात आले आहेत. भाजपाकडून महापौर पदासाठी मुरलीधर मोहोळ तर उपमहापौर पदासाठी सरस्वती शेंडगे यांनी अर्ज भरला आहे तर दुसरीकडं काँग्रेस-राष्ट्रवादीकडून महापौर पदासाठी प्रकाश कदम यांनी अर्ज भरला आहे. दरम्यान, बैठक चालु असताना रिपाइंचे नगरसेवक बैठकीतून उठुन गेले. रिपाइंच्या नाराजीनंतर समीकरणं राखण्यासाठी पर्वतीतून सरस्वती शेंडगे यांचे नाव उपमहापौरपदासाठी समोर आले. रिपाइंला शह देण्यासाठी शेंडगे यांचा अर्ज सादर करण्यात आल्याची चर्चा आहे. दरम्यान, रिपाइंला दुसर्‍यावर्षी संधी देण्यात येईल असे आश्वासन माध्यमांसमोर द्या अशी मागणी रिपाइंच्या नगरसेवकांनी केली आहे.

मुक्ता टिळक आणि डॉ. सिध्दार्थ धेंडे यांची महापौर आणि उपमहापौर पदाची मुदत संपत आल्यानं या पदासाठी दि. 22 नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे. आज (सोमवार) अर्ज भरण्याची मुदत आहे. सध्या पुणे महानगरपालिकेत भाजपाचे 99 नगरसेवक आहेत. त्यामुळे महापौर आणि उपमहापौरपद त्यांच्याकडेच राहणार आहे.

Visit : Policenama.com