यावेळी भाजपच्या घोषणेत ना देवेंद्र, ना नरेंद्र

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन – 9 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेची मुदत संपत आहे.  महाराष्ट्र  विधानसभेसाठी 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. युतीच्या जागावाटपाची घोषणा अद्याप झाली नाही मात्र  भाजपने आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीसाठी “शिवरायांचा विचार, तोच आमचा आचार’ ही घोषणा घेऊन भाजप मैदानात उतरणार आहे. त्यामुळे ह्यावर्षी  भाजपच्या घोषणेत  देवेंद्र,  नरेंद्र नसून शिवराय आहेत.

देशाच्या राजकारणात सर्वाधिक काळ – तब्बल 25 वर्षं टिकलेली मैत्री – अर्थात भाजपा-शिवसेना युती या निवडणुकीआधी तुटली होती. त्यामुळे सर्व मोठ्या निवडणुका एकत्र लढवणारे दोन मित्र वेगळे लढले होते. युती तुटल्यावरच भाजपने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने घोषणा देऊन शिवसेनेला शह दिला होता. छत्रपतींचा आशीर्वाद, चला देऊ मोदींना साथ’ ही घोषणा देऊन भाजपने शिवसेनेला कोंडीत पकडले होते. त्यानंतर या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीसाठी “शिवरायांचा विचार, तोच आमचा आचार’ ही घोषणा घेऊन भाजप मैदानात उतरणार आहे.

2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर राज्यात केंद्रात  नरेंद्र, राज्यात देवेंद्र अशी चर्चा सुरू झाली. तेव्हा मुख्यमंत्री बनण्याच्या स्पर्धेत भाजपच्या नेत्यांनी ही घोषणा हसण्यावारी नेली होती; मात्र प्रत्यक्षात देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री झाले. नवे राज्य, नवे मुख्यमंत्री महाराष्ट्रात 10 नोव्हेंबरनंतर सूत्रे हाती घेतील, पण तो नवा मुख्यमंत्री मीच असेन, दुसरा कोणीही नाही असे श्री. देवेंद्र फडणवीस यांनी ठामपणे जाहीर केले आहे. तसेच निवडणूक जिंकल्यास देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील, असे केंद्रीय गृहमंत्री, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत.

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like