विधानसभा 2019 : भाजपाकडून महिला कुस्तीपट्टू बबिता फोगाटसह 78 उमेदवारांची यादी जाहीर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीबरोबरच हरियाणातील विधानसभा निवडणूका देखील पार पडणार आहेत. भाजपने आपली उमेदवारांची यादी आज जाहीर केली आहे. ही पहिली यादी असून त्यात 78 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे भाजपने हरियाणात खेळाडूंना विधानसभेचे तिकिट दिले आहे.

या पहिल्या यादीत 78 उमेदवारांमध्ये महिला कुस्ती पट्टू बबिता फोगाट हिचा समावेश आहे. बबिता फोगाटला दादरी मधून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. तर भाजपचे नेते आणि हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर हे करनाळ मधून लढणार आहे. तर माजी हॉकीपट्टू संदीप सिंह यांची उमेदवारी पेहोवा मधून घोषित करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात देखील निवडणूकांची घोषणा करण्यात आली आहे. राज्यात निवडणूकीमुळे वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यात अजून भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली नाही. अजूनही भाजप शिवसेनेच्या युतीची घोषणा झाली नाही, मात्र शिवसेनेकडून उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आली. आज अदित्य ठाकरे यांनी देखील घोषणा केली की ते निवडणूक लढवणार आहेत. आज भाजप सेनेच्या युतीची घोषणा होऊ शकते.

Visit : policenama.com