भाजपाची 3 उमेदवारांची यादी जाहीर ; ‘या’ मतदारसंघातून सनी देओल लोकसभेच्या रिंगणात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भारतीय जनता पार्टीकडून लोकसभा निवडणुकीसाठी 3 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. यात पंजाबमधील 2 उमेदावारांचा तर चंदीगडमधील एका उमेदवाराचा समावेश आहे. पंजाबमधील गुरदासपूर येथून नुकताच भाजपात प्रवेश केलेल्या अभिनेता सनी देओल याला उमेदवारी जाहीर झाली आहे.

बॉलिवूड अभिनेता सनी देओल याने आजच (मंगळवार दि 23 एप्रिल) भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल, संरक्षण मंत्री निर्मला सितारमण यावेळी उपस्थि होते. यानंतर आता सनी देओल याला गुरदासपूरमधून तिकीट देण्यात आले आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत अभिनेता विनोद खन्ना यांनी गुरदासपूर येथून विजय मिळवला होता. 27 एप्रिल 2017 रोजी त्यांचं निधन झालं. त्यानंतर झालेल्या पोटीनिवडणुकीत सुनील जाखड यांनी विजय मिळवला होता. याच मतदारसंघातून 2014 च्या आधी विनोद खन्ना 3 वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. यानंतर पुन्हा एकदा भाजपाने याच मतदारसंघातून एका अभिनेत्याला मैदानात उतरवले आहे.

सनी देओल व्यतिरीक्त चंदीगड येथून किरण खेर यांना तिकीट देण्यात आलं आहे तर होशियारपूर येथून सोम प्रकाश यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like