गोरखपूर पुन्हा सर करण्यासाठी भाजपने ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता उतरवला मैदानात

लखनौ : पोलीसनामा ऑनलाइन – उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा पारंपारिक मतदारसंघ म्हणून ओळखला जाणारा गोरखपूर पुन्हा मिळविण्यासाठी भाजपला आता अभिनेत्याची मदत घेण्याची वेळ आली आहे. भाजपने येथून भोजपूरी सिनेमातील लोकप्रिय अभिनेते रवी किशन यांना उमेदवारी दिली आहे.

Image result for ravi kishan best photo

पूर्व उत्तर प्रदेशातील महत्वाचा मतदारसंघ असलेल्या गोरखपूर येथून योगी आदित्यनाथ हे निवडून येत असत. भाजपचा गड म्हणून तो ओळखला जातो. योगी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत सपा व बसपा आघाडीने भाजपचा पराभव करुन धक्का दिला होता. त्यामुळे या निवडणुकीत ही जागा पुन्हा मिळविण्यासाठी भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे त्यांनी भोजपूरी चित्रपटातील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेते रवी किशन यांना उमेदवारी दिली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us