शिवसेनेचे 35 आमदार पक्षावर ‘नाराज’, माजी मुख्यमंत्री नारायण राणेंचा ‘दावा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील ५६ पैकी ३५ आमदार आपल्या पक्ष नेतृत्वावर असमाधानी असल्याचा दावा महाराष्ट्रचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांनी केला आहे. शनिवारी रात्री एका कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना राणे यांनी यासंदर्भात सांगितले. ते म्हणाले की, राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसला सरकार स्थापन करण्यास पाच आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी लागला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला नकारा सरकार म्हंटले आहे, तसेच महाराष्ट्रात भाजपा पुन्हा सत्तेत येईल, असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, भाजपकडे १०५ आमदार आहेत आणि शिवसेनेचे केवळ ५६ आहेत. त्यापैकी ३५ जण असमाधानी आहेत. ते म्हणाले की, ठाकरे सरकारचे शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचे आश्वासन पोकळ आहे. ती कधी अंमलात आणली जाईल यावर कोणतीही वेळ मर्यादा नाही.

सरकार चालवण्याबाबत उद्धव ठाकरे यांना काहीच माहिती नाही :
गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबाद दौर्‍याचा संदर्भ देताना राणे म्हणाले की, या भागाला कोणतीही योजना किंवा कोणताही निधी न घोषित करताच ते परत आले आहेत. ते म्हणाले की, अशा सरकारकडून आपण काय अपेक्षा करू शकतो ? त्यांना सरकार चालविण्याविषयी काही माहिती नाही. त्यांना सरकार स्थापन करण्यास पाच आठवड्यांचा कालावधी लागला. ते सरकार कसे चालवतात हे यावरून दिसून येते.

मनसेने युतीबाबत भाष्य करण्यास नकार दिला आहे :
भाजप आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्यासोबत युती करण्याबाबत भाष्य करण्यास नकार देताना राणे म्हणाले की, त्यावर फक्त भाजप प्रमुख बोलतील. मी तुम्हाला सांगतो की, मी राज ठाकरे आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर मनसे आणि भाजप युतीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, राज ठाकरे यांनी नकार दिला. ते म्हणाले की, दोन्ही पक्षांची विचारधारा वेगळी आहे.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/