BJP Arjun Ram Meghwal | ‘संविधानातील समाजवादी, धर्मनिरपेक्ष शब्द हटवले’; काँग्रेसच्या आरोपावर सरकारचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली : BJP Arjun Ram Meghwal | नव्या संसद भवनाचे नाव संविधान भवन ठेवल्याचे मोदी सरकारने (Modi Govt) जाहीर केल्यानंतर काही तासातच संविधानाच्या नव्या प्रतींमध्ये समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द हटविण्यात आल्याचा प्रकार काँग्रेसने उघडकीस आणल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, यावर भाजपाकडून सभागृहात खुलासा करण्यात आला आहे. (BJP Arjun Ram Meghwal)

संसदेच्या नव्या इमारतीत प्रवेश करताना सर्व खासदारांना सरकारने संविधानाच्या प्रती दिल्या आहेत. लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी संविधानाच्या या नव्या प्रतीच्या प्रस्तावनेतून समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द हटविण्यात आल्याचा आरोप केला. ही चिंतेची बाब असल्याचे चौधरी यांनी म्हटले आहे. (BJP Arjun Ram Meghwal)

अधीर रंजन चौधरी म्हणाले, जर काही बोलायचा प्रयत्न केला, तर सरकार म्हणेल, जे सुरुवातीला होते तेच देत आहोत. सरकारचा हेतू संशयास्पद आहे आणि मोठ्या हुशारीने सरकारने हे दोन्ही शब्द हटवले आहेत. महत्वाचे म्हणजे १९७६ मध्ये इंदिरा गांधी सरकारने हे दोन्ही शब्द राज्य घटनेत सामील केले होते.

चौधरी यांच्या आरोपावर केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल म्हणाले, यासंदर्भात आम्ही यापूर्वीच उत्तर दिले आहे.
प्रतींमध्ये राज्यघटनेच्या प्रास्तावनेची मूळ आवृत्ती होती आणि हे शब्द घटनादुरुस्तीनंतर यात जोडले गेले होते.

तसेच भाजप नेते सुशील कुमार मोदी यांनी खुलासा करताना म्हटले, अधीर रंजन चौधरी यांची माहिती कमी आहे.
खासदारांना ही मूळ प्रत दिली आहे. यावर वाद का होत आहे.
जेव्हा खासदारांना मूळ प्रत दिली जाईल तेव्हा त्यात दोन्ही शब्द असतील.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police | गणेश भक्तांसाठी पुणे पोलिसांकडून ‘गणेशोत्सव 2023 डिजिटल रोड मॅप’ लाँच (व्हिडीओ)

Supriya Sule | अजित पवारांचा अपमान करण्यासाठी सोबत घेतलं का? पडळकरांच्या विधानावरुन सुप्रिया सुळेंचा भाजपला थेट सवाल