×
Homeताज्या बातम्याBJP Ashish Shelar | 'आता तुमच्या पक्षाला पेंग्विन सेना म्हणायचं का?' -...

BJP Ashish Shelar | ‘आता तुमच्या पक्षाला पेंग्विन सेना म्हणायचं का?’ – आशिष शेलार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – BJP Ashish Shelar | भाजपाने (BJP) मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) शिवसेनेकडून (Shivsena) हिसकावून घेण्यासाठी आतापासून कंबर कसली आहे. भाजपा नेते सुद्धा आक्रमक झाले असून शिवसेनेला चारही बाजूने घेरले जात आहे. भाजपाने मुंबईची जबाबदारी आशिष शेलार (BJP Ashish Shelar) यांच्यावर सोपवली आहे. शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर टीका केल्याने त्या टीकेला शेलारांनी वैयक्तिक टिपण्णी करत प्रत्युत्तर दिले आहे.

 

शिवसेनेवर टिका करण्यासाठी आशिष शेलार (BJP Ashish Shelar) यांनी सामनाचे संपादक उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना एक छोटे पत्र लिहिले असून यात म्हटले आहे की, आपण आमच्या कमळाला हिणवायला बाई म्हणताय? हरकत नाही. बाईमध्ये आई, ताई आणि कडक लक्ष्मीपण आहे. त्यामुळे तुमच्या उरल्यासुरल्या पक्षाला, आम्ही आता पेग्विन सेना (Peguin Sena) म्हणायचे का? असे कडक अस्सल मुंबईकर शब्द आमच्याकडे पण आहेत. कृपया हे लक्षात असू द्या.

 

महापालिकेच्या भ्रष्टाचारावर शेलारांचा प्रहार

दरम्यान, मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल (Municipal Commissioner Iqbal Singh Chahal) यांना पत्र लिहून महापालिकेत मोठा भष्ट्राचार (Corruption) झाल्याचे म्हटले आहे, तसेच या भ्रष्टाचाराची चौकशी करावी अशी मागणी केली आहे. मुंबई महापालिकेच्या 480 शाळांमध्ये सुरू असलेल्या व्हर्च्युअल क्लासरुम चालवण्याबाबत निविदेमध्ये पादर्शकता दिसून येत नाही. यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे, असे शेलार यांनी म्हटले आहे.

 

या पत्रात नमूद केले आहे की, सदर निविदेचा अभ्यास केल्यानंतर असे निदर्शनास येते की,
या निविदेमध्ये घालण्यात आलेल्या अटी-शर्ती या एका विशिष्ट कंत्राटदाराला ही निविदा मिळावी म्हणून घालण्यात आल्या आहेत.
ज्या कंपनीला हे काम देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे,
सदर कंपनीने दिलेले अनुभवाचे प्रमाणपत्र बोगस व खोटे असल्याचे दिसून येते आहे.

 

त्याची महापालिकेच्या संबंधितांनी पडताळणी न करताच सदर कंपनीला काम प्रस्तावित केल्याचे दिसून येत आहे.
हे काम तांत्रिक असल्याने कामांचे तांत्रिक गुणांकन होणे अपेक्षित होते, मात्र तसे झालेले दिसून येत नाही.

 

Web Title :- BJP Ashish Shelar | bjp ashish shelar letter to shivsena chief
uddhav thackeray want to call your party penguin sena now

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Must Read
Related News