‘शिवसेनेचा दुटप्पीपणा, मुंबईवरील बेगडी प्रेम उघड ? मरिन ड्राईव्हच्या किनाऱ्याला ढोंगीपणाचा गाळ दिसला’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   भाजपचे नेते आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ट्विट करत त्यांनी आपलं म्हणणं मांडलं आहे. झाला ना तुमचा दुटप्पीपणा, मुंबईवरील बेगडी प्रेम उघड ? मरिन ड्राईव्हच्या किनाऱ्याला ढोंगीपणाचा गाळ दिसला असं शेलार म्हणाले आहेत.

आपल्या ट्विटमध्ये आशिष शेलार म्हणाले, “केंद्र सरकारच्या पुढाकारानं पर्यावरणपूरक एलईडी दिवे मुंबईत लावले गेले तेव्हा काही जणांनी मरिन ड्राईव्ह, क्वीन नेकलेसची शोभा जाईल म्हणून केवढा थयथयाट केला. अखेर झालं काय ? तर शोभा वाढलीच ना. पण आता क्वीन नेकलेसची माळच ते तोडून टाकत आहेत , क्वीन नेकलेसच राहणार नाही त्याचं काय ?” असा सवाल शेलारांनी केला आहे.

आणखी एका ट्विटमध्ये आशिष शेलार म्हणतात, “आता पारसी गेट तोडलाच. समुद्रात अधिकचा भराव टाकून ती जागा पण खाणार. परिसराची शोभा घालवणार. आता हे तुम्ही करताय ते पुण्य ? आम्ही पर्यावरणपूरक दिवे लावले ते पाप ? झाला ना तुमचा दुटप्पीपणा, मुंबईवरील बेगडी प्रेम उघड ? मरिन ड्राईव्हच्या किनाऱ्याला ढोंगीपणाचा गाळ दिसला ना.” असं शेलार म्हणाले आहेत. याआधीही आशिष शेलार यांनी ट्विटरवरून महाविकास आघाडीवर निशाणा साधला होता.

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like