भाजप नेत्यांचा विरोधकांवर ‘हल्लाबोल’, म्हणाले – ‘हातात संविधान अन् मनात वारिस पठाण’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एमआयएमआयएमचे नेते ओवैसी यांच्या व्यासपीठावर पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. यावरून भाजपचे प्रवक्ता संबित पात्रा यांनी हल्लाबोल करत निशाणा साधला आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात द्वेषाचे राजकारण सुरु आहे. देशभर द्वेष पसरविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ओवैसी यांच्या व्यासपीठावरून पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणाऱ्याकडून माईक हिसकावून घेतला. मात्र, वारिस पठाण याचा भाषणावेळी माईक का घेतला नाही. त्यावेळी ओवैसी मंचावरच उपस्थित होते. जे व्यासपीठामागे सांगितले जाते तेच स्टेजवर आल्यावर समोर येते, असे संबित पात्रा यांनी म्हटले आहे.

संबित बात्रा म्हणाले, सीएए विरोधात संपूर्ण देशात राजकीय द्वेष पसरवण्याचे काम काही लोक करत आहेत. देशात होत असलेल्या आंदोलनाचा तथाकथील प्रमुख कोण असेल तर ते ओवैसी आणि त्यांचा पक्ष असल्याचे संबित पात्रा म्हणाले, दिल्लीमध्ये पक्षाच्या मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ओवैसी आणि त्यांच्या पक्षावर निशाणा साधला. यावेळी प्रश्न उपस्थित करताना पात्रा म्हणाले, तुम्हाला कशा प्रकारचे स्वातंत्र्य पाहिजे ते सांगा. याबाबत 15 कोटी विरुद्ध 100 कोटी अशी भाषा का वापरली जात आहे, असा प्रश्न उपस्थित करून ओवैसी यांचा हेतू चुकीचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी, प्रियंका गांधींसह विरोधकांवर हल्ला चढवताना संबित पात्रा म्हणाले, सीएएच्या नावावर हे लोक संभ्रम पसरवत आहेत. त्यांच्या हातात संविधान आहे. मात्र त्यांच्या हृदयात एक वारिस पठाण आहे. भूतकाळात ज्या देशाला त्रास सहन करावा लागला होता, त्या देशाने पुन्हा अशा प्रकराच्या षडयंत्रांना बळी पडायला पाहिजे ज्यामुळे देशाची अखंडतेत बाधा निर्माण होईल असा हेतू विरोधकांचा असल्याचे पात्रा यांनी म्हटले आहे.