अमित शाहांच्या नेतृत्वात पार पडणार महाराष्ट्रासह ‘या’ राज्याच्या ‘विधानसभा’ निवडणूका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – येणाऱ्या काळात महाराष्ट्र, झारखंड आणि हरियाणा या राज्यात विधानसभा निवडणूका लढवल्या जाणार आहेत. या निवडणूका भाजपासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत यामुळे की काय या राज्यातील विधानसभा निवडणूका गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वात लढवण्यात येणार आहेत. यामुळे भाजप या राज्यात आपली मोठी ताकद लावणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

अमित शाहांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात विधानसभा निवडणूका
लोकसभेत भाजपने ३०३ जागा मिळवून मोठे यश मिळले आहे यामुळे भाजपचा आत्मविश्वास दुप्पटीने वाढला आहे. भाजपला आपला नवा राष्ट्रीय अध्यक्ष या तीन राज्याच्या विधानसभा निवडणूकानंतर मिळणार आहे. परंतू अमित शाह यांना गृहमंत्री बनवण्यात आल्यानंतर जेपी नड्डा यांना कार्यकारी अध्यक्ष बनवण्यात आले आहे. नवे अध्यक्ष आणि संपूर्ण देशाच्या संघटना निवडणूकीसाठी भाजपच्या राधा मोहन सिंह यांच्या नेतृत्वात निवड समितीचे गठन करण्यात आले आहे.

परंतू देशभरातील संघटनेच्या निवड प्रक्रियेस उशीर होणार असल्याने राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठीच्या निवडीला १५ डिसेंबरनंतर होण्याची शक्यता आहे. जे कार्यक्रम निश्चित करण्यात आले आहेत त्या नुसार संघटना निवड प्रक्रिया ११ सप्टेंबर पासून सुरु होईल. ११ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबरच्या दरम्यान मंडळ स्तरावरील अध्यक्षाची निवड करण्यात येईल. तर १ ते १५ सप्टेंबर दरम्यान प्रदेश अध्यक्ष आणि राष्ट्रीय परिषदेच्या सदस्यांची निवड करण्यात येईल.

स्थानिक आणि राज्य स्तरावर संघटनेच्या निवडी निश्चित झाल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी निवड प्रक्रिया राबवण्यात येईल. ही निवड प्रक्रिया १५ दिवस ते १ महिन्यासाठी चालेल. म्हणजेच भाजपला पुढील राष्ट्रीय अध्यक्ष १५ डिसेंबरला मिळेल. भाजपचे सध्या सदस्यता अभियान सुरु आहे, हे आभियान आधी ११ ऑगस्ट पर्यंत चालणार होते आता हे २० ऑगस्ट पर्यंत चालणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त