‘सरकारी भीक न मिळाल्यानं…’, डायरेक्टर अनुराग कश्यपवर भाजपचा पहिल्यांदाच ‘पलटवार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – केंद्र सरकारने देशात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू केल्यानंतर देशभरातून याला विरोध होताना दिसत आहे. बॉलिवूड डायरेक्टर अनुराग कश्यप हेही सुरुवातीपासून या कायद्याच्या विरोधात आहेत. अनुराग यांनी आजपर्यंत सरकारवर अनेकदा निशाणा साधला आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचाही समावेश आहे. अनुराग यांनी अनेकदा ट्विट करत टीकास्त्र सोडलं आहे. परंतु भाजपने पहिल्यांदाच त्यांना प्रत्युत्तर देत त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले भाजप ?
अनुराग यांनी नागरिकत्व कायद्याला विरोध करताना काही अपशब्द वापरले आहेत. यानंतर भाजपने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपचे उत्तर प्रदेशातील प्रवक्ते शलभ मणी त्रिपाठी यांनी ट्विट केलं आहे. यात अनुराग कश्यप यांनी सरकारला पाठवलेली काही पत्रे आहेत. ही पत्रे शेअर करत त्रिपाठी म्हणाले आहेत की, “पडलेल्या सिनेमांसाठी सरकारकडून भीक न मिळाल्याने अनुराग कश्यप संतापला आहे. त्याने शिव्या देण्यास सुरुवात केली आहे.”

आधीच्या सरकारवर सोडलं टीकास्त्र
अनुराग यांना टारगेट करतानाच त्रिपाठी यांनी आधीच्या सरकारवरही टीका केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “आधीच्या सरकारकडून पडलेल्या सिनेमांना करोडो रुपये देण्यात आले. यश भारती सन्मानाच्या नावाखाली सरकारकडून देण्यात येणारे अनुदान बंद करण्यात आले. योगींनी है पेसे गरीब आणि विधवा तसेच शेतकऱ्यांना वाटले. याचाच त्यांना राग आहे.”

अनुराग कश्यप यांनी दिले ‘हे’ प्रत्युत्तर
अनुराग यांनी भाजपच्या आरोपांना उत्तर देत म्हटलं आहे की, “उत्तर प्रदेश सरकारची जाहिरात करण्याच्या उद्देशाने बनवण्यात आलेल्या सिनेमांसंदर्भात हा पत्रव्यवहार होता.”

पूर्वी सत्तेत असणाऱ्या अखिलेश यादव सरकारकडून राज्यातील कलाकारांना यश भारती सन्मान आणि 50 हजारांची पेन्शन दिली जात होती. यानंतर सत्तेत आलेल्या योगी सरकारने हे अनुदान बंद केलं.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like