‘मुंबई आमची असा उठता बसतां ध्यास करणाऱ्यांनी काय दिलं ?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात मान्सूनचे (Monsoon) आगमन झाले आहे. मुंबईत मान्सून (Monsoon in Mumbai) दाखल होताच पावसानं (Rain) शहर आणि उपनगर भागाला झोडपून काढले आहे. सखल भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. यावरुन भाजपने (Bjp) शिवसेनेला (Shivsena) लक्ष्य केलं आहे. मुंबई Mumbai आमची असा उठता बसता ध्यास करणाऱ्यांना काय दिलं ? असा सवाल भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी ट्विटद्वारे केला आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

वडिल अन् सासूमध्ये असलेलं झेंगाट मुलाला कळालं, पोरानं उचललं हे पाऊल

काय म्हणाले केशव उपाध्ये ?
नितीन गडकरी (Nitin Gadkari) व देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे नागपूरचे (Nagpur) पण त्यांनी मुंबईच्या विकासात भरीव योगदान केलं. गडकरींनी मुंबईत 56 पूल बांधले. फडणवीसांनी मेट्रोचं (Metro) जाळे विणले. याउलट मुंबई आमची असा उठता बसता ध्यास करणाऱ्यांनी काय दिलं ? असा सवाल उपाध्ये यांनी केला आहे. तसेच दरवर्षी पावसात तुंबणारी मुंबई, खड्डे, अनधिकृत बांधकाम व ते पडल्यानं जाणारे जीव, असंही उपाध्ये यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

न्यायालयीन चौकशीचे आदेश
दरम्यान, मालाड मालवणीमध्ये तीन मजली बेकायदा इमारत कोळसून झालेल्या दुर्घटनेत 12 जाणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी घडली असून या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) काल (शुक्रवार) दिले आहेत. मुंबई महानगर प्रदेशातील इमारती कोसळणाऱ्या घटनांची गंभीर दखल घेऊन उच्च न्यायालयाने मागील वर्षी स्वयंप्रेरणेने (सुटो मोटो) जनहित याचिका दाखल करुन घेतली आहे.

Web Title : bjp attacks on shivsena over building collapsed in mumbai

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

12 जून राशीफळ : ‘या’ 6 राशींना होणार फायदा, नोकरी-व्यापार आणि आर्थिक क्षेत्रात मिळेल यश, इतरांसाठी असा आहे शनिवार

फेसबुकवर महिन्याभरापूर्वीच ओळख झालेल्या मित्राने आयटी इंजिनिअर महिलेला 44 लाख रुपयांना फसवलं; कोरोना व इतर भूलथापा मारल्या

सर्वात चांगली लस कोणती Covishield, Covaxin की Sputnik-V? जाणून घ्या एम्स संचालकांनी काय म्हटले

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा