अखिलेश यादवांचा भाजपावर ‘गंभीर’ आरोप, म्हणाले – ‘मला जीवे मारण्याचा प्रयत्न’

कन्नौज (उत्तप्रदेश) : वृत्तसंस्था – समाजवादी पार्टीचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. भाजप नेत्याने मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. कन्नौजमध्ये त्याच नेत्याने एका तरुणाला पाठवून कार्यक्रम उधळण्याचा प्रयत्न केला. पण लक्षात ठेवा, तुम्हाला कन्नौजमध्ये कार्यक्रम करु देणार नाही, असा इशारा अखिलेश यांनी यावेळी दिला.

कन्नौज येथे सपाच्या महिला परिषदेदरम्यान एका युवकाने अखिलेश यादव यांच्या सभेत प्रवेश केला आणि जयश्री राम अशी घोषणाबाजी केली. यावेळी सपाच्या कर्यकर्त्यांनी त्याला मारहाण केली आणि पोलीसांच्या स्वाधीन केले. यावरून अखिलेश यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर टीका केली. तर दोन दिवसांपूर्वीच आपल्याला जिवे मारण्याची धमकी फोनकरून मिळाली होती. त्यामुळे कदाचित भाजपच्या नेत्याने सपाच्या कार्यक्रमात दाखल झालेल्या तरुणांना पाठवले असेल असे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे.

अखिलेश यादव यांचे कन्नौज येथील एका कार्यक्रमात भाषण सुरु होते. ते मोदी सरकारच्या कारभारावर टीका करत होते. त्याचवेळी एका तरुणाने मंचावर धाव घेतली आणि आपण सत्तेत आलात तर काय करणार असा जाब विचारला. पोलिसांदेखत हा प्रकार घडल्याने अखिलेश यादव यांनी बंदोबस्तावरील पोलिसांना फैलावर घेतले. यानंतर सपाच्या कार्यकर्त्यांनी तरुणाला बेदम चोप दिला. त्या तरुणाने जय श्रीरामचा नाराही दिला होता.

You might also like