‘शरद पवारांच्या उपस्थितीत झालेला निर्णय रद्द, मुख्यमंत्र्यांनी बॉस असल्याचं दाखवून दिलं’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – President Sharad Pawar | महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (MHADA)च्या वतीने कर्करोगग्रस्त (Cancer) रुग्णांच्या नातेवाईकांची व काळजीवाहू व्यक्तींच्या निवासाची सोय होण्यासाठी टाटा मेमोरियल रुग्णालया (Tata Memorial Hospital) ला १०० सदनिका हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय घेताना राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) चे अध्यक्ष शरद पवार (President Sharad Pawar) हेही उपस्थित होते. मात्र या निर्णयाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरें (Chief Minister Uddhav Thackeray) नी स्थगिती दिल्याचे समोर आले आहे. ठाकरे यांनी स्थगिती देण्याबरोबरच गृहनिर्माण विभागा (Department of Housing) च्या प्रधान सचिवाना याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिला आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

दरम्यान, यावरून भाजप (BJP) ने महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi government) वर टीका केली असून या निर्णयाला सत्ता संघर्षाची किनार असल्याचे म्हंटले आहे. एवढेच नाही तर आपणच बॉस असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दाखवून दिले असल्याचंही भाजप प्रवक्ते आणि आमदारांनी म्हंटलं आहे. टाटा कॅन्सर हॉस्पिटलमधील रुग्णांच्या निवाऱ्यासाठी जवळच्या सुखकर्ता-विघ्नहर्ता सोसायटीत काही घरे देण्याचा निर्णय गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत जाहीर केला होता. परंतु, मुख्यमंत्र्यांनी एका सहीच्या फटकाऱ्यासह हा निर्णय रद्द केला.

माणुसकी खड्ड्यात अशा आशयाचे ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयाला महावसुली सरकारमधील सत्ता संघर्षाची किनार आहे. आपणच बॉस असून पवारांना फाट्यावर मारतो हे मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिले. परंतु कुरघोडीच्या राजकारणात त्यांनी माणुसकीचा मात्र बळी दिला. राजकारणाने नीच पातळी गाठली आहे असेही त्यांनी ट्विट मध्ये म्हंटले आहे.

नेमकं काय झालं आहे –
देशभरातून टाटा मेमोरियल रुग्णालयात रुग्ण येत असतात. त्यांच्या सोबत येणाऱ्या नातेवाईकांची राहण्याची व्यवस्था नाही. बरेचदा आर्थिक परिस्थिती नसल्याने नातेवाईकांना फुटपाथचा आसरा घ्यावा लागतो. ही गैरसोय टाळण्यासाठी परळ शिवडी विभागातील करीरोड येथील हाजी कासम चाळीच्या पुनर्विकासातून मिळालेल्या सदनिकांपैकी ३०० चौरस फूट क्षेत्रफळाच्या १०० सदनिका टाटा मेमोरियल रुग्णालयास नाममात्र दराने (१ रुपया प्रति वर्ष) देण्याचा निर्णय गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी घेतला होता.

दरम्यान तेथील शिवसेनेचे आमदार अजय चौधरी यांनी या निर्णयाविरोधात तक्रार केली. सुखकर्ता आणि विघ्नहर्ता या पुनर्विकसीत इमारतींमधील १०० सदनिका कर्करूग्णांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी देण्याच्या निर्णयामुळे येथील रहिवाशामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या इमारतींमध्ये ७०० मराठी कुटूंबे वास्तव्य करीत आहेत. त्यामुळे या निर्णयाला तत्काळ स्थगिती द्यावी.

त्याचबरोबर टाटा रूग्णालयास भोईवाडा येथील म्हाडा गृहसंकुलालामधील तयार इमारतीमधील सदनिका द्यावी अशी मागणी या पत्रातून चौधरी यांनी केली होती.
या पत्राची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिवांना आमदार चौधरींच्या पत्रावर‘ तपासून अहवाल सादर करावा,
तोपर्यंत स्थगिती देण्यात येण्यात येत आहे’ असे आदेश दिले आहेत.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Titel : bjp atul bhatkhalkar ncp sharad pawar maharashtra cm uddhav thackeray jitendra awhad cancer patients mhada

हे देखील वाचा

Pimpri News | पहिला विवाह झाला असताना लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

‘डोंगर’ पोखरुन ‘उंदीर’ही नाही निघाला; परिवहन मंत्री अनिल परब यांना मोठा दिलासा

कोरोना झाल्यानंतर एवढ्या दिवसांपर्यंत शरीरात राहतात अ‍ॅन्टीबॉडी, वैज्ञानिकांनी सांगितलं

या’ 5 मसाल्यांना मिसळून बनवा इम्युनिटी बुस्टर काढा, जाणून घ्या कधी अन् कसा प्यायचा