महापालिका निवडणुकीपुर्वीच भाजपला मोठा ‘धक्का’ बसणार, बड्या पदाधिकार्‍यासह 6 नगरसेवक ‘शिवबंधन’ बांधणार

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन  – राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक बदल व्हायला सुरुवात झाले आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपामध्ये सुरु असलेले इनकमिंग आता बंद झाले असून आता आऊटगोइंग सुरु होऊ लागले आहे. औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपाचे माजी शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी हे त्यांच्या समर्थक नगरसेवक लवकरच शिवबंधन बांधणार आहेत. त्यांच्या सोबत ६ ते ७ नगरसेवक शिवसेनेत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नवाणी आणि त्यांचे समर्थक नगरसेवक मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधण्याची शक्यता आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबादमध्ये सेनेची ताकद कमी झाल्याची चर्चा सुरु होती. त्यात आता भाजपा आणि शिवसेना वेगळी झाल्याने महापालिका निवडणुकीत कोणताही फटका बसू नये, म्हणून शिवसेनेने आपली ताकद वाढविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यातूनच पूर्वश्रमीचे शिवसैनिक तनवाणी हे भाजपामध्ये नाराज असल्याचे लक्षात आल्यावर शिवसेनेने त्यांना गळ घातला आहे