भाजपने बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन शंका दूर करावी : उद्धव ठाकरे

मुंबई :वृत्तसंस्था

भाजपच्या कर्नाटक विजयानंतर आता देशभरातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. यात आता उद्धव ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. भाजपचा पोटनिवडणुकांमध्ये पराभव होतोय, तर निवडणुकांमध्ये विजय होतोय. त्यामुळे ईव्हीएमबाबत जो सर्वांच्या मनात संशय आहे, तो भाजपने बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन विजय आणून दाखवावा, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला.

निवडणुकीत भाजपच्या विजयानंतर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे म्हणाले, जे जिंकले आहेत, त्यांचे अभिनंदन करतो, शिवाय मुख्यमंत्री कुणीही झाला, तरी त्याने मराठी माणसाचा आदर करावा, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

कर्नाटक विधानसभेवर कुणाचा झेंडा हे आज स्पष्ट होणार आहे. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. कर्नाटकच्या 224 सदस्य असलेल्या विधानसभेच्या 222 जागांसाठी 12 मे रोजी 72.13 टक्के मतदान झाले. सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपने मोठी मुसंडी मारली. भाजपचे 106 उमेदवार (दुपारी 2.30 वाजता) आघाडीवर आहेत, काँग्रेसचे 74, तर जेडीएसचे 39 उमेदवार आघाडीवर आहेत. बहुमताचा आकडा हा 111 आहे. त्यामुळे कर्नाटकात सत्तेची समीकरणे कशी जुळतात, त्याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.