BJP | भाजपला मोठा झटका ! राज्यात BJP मधून आऊटगोइंग सुरू

बुलडाणा : पोलीसनामा ऑनलाइन – BJP | नुकतंच उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar) टीम ओमी कलानीतील 22 नगरसेवक हे राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली. ओमी कलानी यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे भाजपला (BJP) मोठा दणका बसला आहे. त्यातच आता बुलडाणामध्ये देखील भाजपसोबत धक्कातंत्र निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. बुलडाणामध्ये (Buldana) चिखली नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा प्रिया बोंद्रे आज शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात (Congress) प्रवेश करणार आहेत. एक जिल्हा परिषद सदस्य, नगर परिषद पाणि पुरवठा सभापतींसह काही पंचायत समिती सदस्य आणि शेकडो भाजपचे कार्यकर्ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

काँग्रेस नेत्या आणि मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, टीम ओमी कलानीतील (omie kalani) 22 नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ आपल्या हाती बांधणार आहेत. ओमी कलानी यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे भाजपला (BJP) मोठा झटका बसला आहे.

या दरम्यान, कारागृहात असलेले पप्पू कलानी (Pappu Kalani) पेरोलवर बाहेर आले आहेत.
कारागृहातून पप्पू कलानी बाहेर येताच राजकीय गाठीभेटी सुरू झाल्या आहेत. नुकतीच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी उल्हासनगरात जाऊन पप्पू कलानी यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता टीम ओमी कलानीतील 22 नगरसेवक हे राष्ट्रवादीत सहभागी होत आहेत. पण, भाजपने हा दावा फेटाळून लावत हे नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार नसल्याचं म्हटलं आहे.

Web Title :- BJP | bjp outing priya bodre will join congress party today in buldhana district

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Anti Corruption Bureau Mumbai | 15 हजारीची लाच मागणारे अंमली पदार्थ विरोधी पथकातील 2 पोलीस अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Modi Government | दुचाकीवर 4 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी हेल्मेट सक्ती? मोदी सरकारने सूचना अन् हरकती मागवल्या

Krishi UDAN scheme | खुशखबर! शेतकर्‍यांसाठी मोदी सरकारने सुरू केली नवीन सुविधा, उत्पन्न दुप्पट करण्यात होईल मदत