‘नेहरुंमुळेच मसूद अझहरला जागतिक दहशतवादी ठरवण्यात अपयश’

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यास जबाबदार असेलल्या पाकिस्तानमधील जैश ए मोहम्मद संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरला जागतिक दहशतवादी ठरवण्याच्या भारताच्या प्रयत्नांना चीनने पुन्हा एकदा खोडा घातला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळात चीनने पुन्हा नकाराधिकाराचा वापर केला आहे. यामुळे भारताच्या प्रयत्नांवर पाणी फिरले आहे. याचे पडसाद आता भारताच्या राजकारणात उमटू लागले आहेत. नरेंद्र मोदी चीनच्या अध्यक्षांना घाबरतात असाट टोला राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींना लावला होता. राहुल गांधी यांना भाजपाने ट्विट करुन उत्तर दिले आहे. अझहरला दोषी न ठरवता येण्यासाठी तुमचे पणजोबा म्हणजेच भारताचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरुच जबाबदार असल्याचे भाजपने म्हटले आहे.

मसूद अझहरला दहशतवादी ठरवण्यात भारत अयशस्वी ठरल्यानंतर राहूल गांधी यांनी मोदींवर टिका केली आहे. दुबळे पंतप्रधान चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना घाबरतात. चीन जेव्हा कधी भारताविरोधात कारवाई करते तेव्हा एक शब्दही तोंडाबाहेर येत नाही. असे राहुल गांधी यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.तसेच गुजरातमध्ये शी जिनपिंग यांच्याबरोबर झोके घेणे, दिल्लीत भटकणे आणि चीनमध्ये त्यांच्यासमोर झुकणे हीच मोदींची चीनबरोबरची कुटनिती आहे, असेही म्हटले आहे.

जर तुमच्या पणजोबांनी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा मंडळाची भारताला मिळत असलेली स्थायी सदस्यत्वाची जागा चीनला भेट म्हणून दिली नसती तर चीन आज संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा मंडळामध्ये नसता. तुमच्या कुटुंबाने केलेल्या सर्व चुका भारत दुरुस्त करत आहे. भारत दहशतवादाविरुद्धची लढाई नक्कीच जिंकेल. हा विषय मोदींवर सोडून तुम्ही चीनच्या शिष्टमंडळांना गुप्तपणे भेटणे सुरु ठेवा,’ असा टोला भाजपाने आपल्या ट्विटमधून राहुल गांधी यांना लगावला आहे.

ह्याहि बातम्या वाचा –

राष्ट्रवादी काॅंग्रेस : ‘त्या’ 3 महत्वाच्या मतदार संघांत सस्पेंस कायम 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेला ‘त्या’ मतदारसंघात राष्ट्रवादीकडून पाठिंबा

‘त्या’ भाजप खासदाराच्या मुलाला अंमली पदार्थांसह अटक

लातुरमध्ये सुजय विखे प्रकरणाची पुनरावृत्ती होणार का ?

जनतेशी माझी युती, जनता जनार्दन पाठीशी, मग काय कुणाची भीती