धनंजय मुंडे प्रकरणी भाजपानं सोडलं मौन, म्हणाले – ‘गेंडयाच्या कातडीचे हे मंत्री राजीनामा देतील असं वाटत नाही, पण..’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री असलेल्या धनंजय मुंडे यांनी आपल्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपाबद्दल तात्काळ राजीनामा द्यावा. मुंडे यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप पाहता त्यांना मंत्रिपदावर राहण्याचा कोणताही हक्क नाही. मात्र गेंड्याचे कातडीचे हे मंत्री आणि महाविकास आघाडीचे सरकार याबाबत आत्मपरीक्षण करून मुंडेचा राजीनामा घेतील असे वाटत नाही, तरीही मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली.या प्रकरणानंतर गेल्या 24 कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मुंडे प्रकरणात भाजपा नेत्यांचे मौन का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. किरीट सोमय्या वगळता इतर कोणत्याही नेत्याने यावर भाष्य करणे टाळले होते. भाजपाच्या महिला आघाडीच्या उमा खापरे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. परंतु प्रदेशाध्यक्ष, विरोधी पक्षनेते यांनी याबाबत काहीही विधान केले नव्हते. अखेर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.