पुढचं ठरवण्यासाठी ‘भाजप’नं बोलवली आमदारांची ‘बैठक’, ‘त्या’बाबत चर्चा करुन ठरवणार

मुंबई, पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात महाशिवआघाडीची गणितं जुळत असताना दुसरीकडे भाजपच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. मुंबईत नुकतीच महाशिवआघाडीची तिन्ही नेत्यांची बैठक पार पडली तर आता भाजपने देखील आपल्या 105 आमदारांसह, सहकारी पक्षांच्या आमदारांसह समर्थन दिलेल्या आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत राज्यातील राजकीय परिस्थितीवर व इतर प्रमुख मुद्यावर चर्चा होणार असल्याचे भाजप नेते अशिष शेलार यांनी सांगितले.

अशिष शेलार म्हणाले की आज भाजपाच्या निवडूण आलेल्या सर्व 105 आमदारांची बैठक प्रथमच भाजप कार्यालयात होत आहे. या बैठकीत आम्हाला समर्थन देणाऱ्या सहकारी पक्षाचे आमदार देखील उपस्थित असतील. ज्या अपक्ष आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपाला समर्थन दिलं आहे ते आमदार देखील या बैठकीला उपस्थित आहेत आणि आता सुरु झालेल्या या बैठकीत प्रामुख्याने तीन महत्वाच्या मुद्यांवर चर्चा होईल.

या बैठकीत ज्या महत्वाच्या मुद्यावर चर्चा होईल त्यातील पहिला मुद्दा आहे, देवेंद्र फडणवीस हे राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा करणार आहे. दुसरा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान, यावर चर्चा करेल, त्यांना मदत कशी पुरवता येईल यावर चर्चा होईल. तिसरा मुद्दा म्हणजे भाजपच्या अंतर्गत संघटनात्मक निवडणूकीचा कार्यक्रम घोषित झाला आहे. त्यामुळे अंतर्गत निवडणूकीच्या कार्यक्रमावर चर्चा होईल.

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या महाशिवआघाडीच्या नेत्यांची मुंबईत गुरुवारी बैठक पार पडली. या बैठकी समान किमान कार्यक्रमाच्या मसूद्यावर चर्चा झाली आणि त्याला अंतिम स्वरुप देण्यात आले. परंतू हा मसूदा पक्षक्षेष्ठींना पाठवण्यात येईल. यावर आवश्यक बदल करण्यात येईल. त्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल.

आघाडी आणि शिवसेनेच्या बैठकीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, माणिकराव ठाकरे उपस्थित होते. यावेळी विशेष म्हणजे शिवसेनेशी वाद असताना देखील राष्ट्रवादीचे छगन भुजबळ देखील शिवसेनेच्या नेत्यांशी चर्चा करण्यासाठी उपस्थित होते. यावेळी पायाभूत सुविधा, शेतकऱ्यांची परिस्थिती, यावर ध्येय धोरणे, शहर विकास यावर चर्चा झाली. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी याबैठकीत झालेल्या बाबींची माहिती दिली.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like