भाजपकडून पश्चिम बंगालमध्ये पाळण्यात आला ‘ब्लॅक डे’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि टीएमसीमध्ये तणावपुर्ण वातावरण पाहायला मिळत आहे. भाजपने बशीरहाटमध्ये सोमवारी 12 तासाचा बंद करण्याचे आवाहन केले आहे. तेथे आज भाजपकडून ब्लॅक डे म्हणून पाळण्यात येणार आहे. केेंद्रीय गृह मंत्रालयाने राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेसाठी एडवाइजरी जारी केली आहे. बंगालमध्ये पंचायत निवडणूकीपासून ते लोकसभा निवडणूकपर्यत सतत हिंसेच्या प्रकाराच्या बातम्या येत आहेत. पश्चिम बंगालचे राज्यपाल केसरी नाथ त्रिपाठी यांनी राज्यात होणाऱ्या हिंसेवर गंभीर खंत व्यक्त केली आहे. असे सांगण्यात येत आहे की राज्यपाल राजकीय हिंसेबाबत लवकरच केंद्रीय मंत्री अमित शाह आणि पंतप्रधान मोदी यांची भेट घेतील.

केंद्राने जारी केलेल्या एडवायजरी मध्ये सांगण्यात आले आहे की, राज्यात हिंसा सुरु आहे आणि हा चिंतेचा विषय आहे. परंतु पश्चिम बंगाल सरकारने केंद्राला पत्र लिहून कळवले आहे की, हिंसेच्या प्रकारात कोणताही विलंब न लावता योग्य ती कारवाई करण्यात आली आहे. बंगालमध्ये दोन्ही पक्षांच्या झालेल्या हत्येत दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप करत आहेत. टीएमसीने सांगितले की त्यांच्या कार्यकर्त्यांच्या हत्येत भाजपचा हात आहे तर भाजपकडून सांगण्यात येते की त्यांच्या कार्यकर्त्यांच्या हत्येत टीएमसीचा हात आहे.

बशीरहाट मध्ये झेंडे हटवण्याच्या वादातून टीएमसी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती. त्यात 8 लोकांचा मृत्यू झाला होता. त्यात भाजपचे 5 तर टीएमसीचे 3 कार्यकर्त्यांचा समावेश होता. रविवारी भाजपच्या कार्यकर्त्यांनी बशीरहटमध्ये प्रेतयात्रा काढल्यानंतर तणावपुर्ण वातावरण झाले होते. पोलिसांनी अशा प्रकारे प्रेत यात्रा काढण्यापासून त्यांना थांबवले होते.

आरोग्यविषयक वृत्त –

लसणाच्या सालीत आहेत ‘हे’ खास गुणधर्म, होतात खास फायदे

अशुद्ध रक्ताने भेडसावते पिंपल्स आणि थकव्याची समस्या

पहाटे सेक्स केल्याने हार्ट अटॅकचा धोका होतो कमी

‘या’ उपायाने होते मांड्यांची चरबी कमी

Loading...
You might also like