भाजप करु शकतो सत्तास्थापनेचा ‘दावा’, राष्ट्रपती राजवट की भाजप सरकार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील राजकारणात मोठं मोठ्या घडामोडी घडतं आहेत. ज्या भाजपने राज्यपालांना सांगितले की आपल्याकडे सत्तास्थापनेसाठी आवश्यक संख्याबळ नाही त्यामुळे त्यांनी सत्तास्थापनेचा दावा नाकारला होता. त्यानंतर आता माहिती येताना दिसत आहे की भाजप सत्तास्थानेचा दावा करु शकते. या घटनेनंतर आता राज्यातील घडामोडींना वेग आला आहे.  राष्ट्रपती राजवट हंगामी असल्याने भाजप सत्ता स्थापनेचा दावा करु शकते.

भाजप सत्तास्थापनेचा दावा करु शकतो ही माहिती समोर आल्याने आता राजकीय वारे पुन्हा फिरु शकते. दिल्लीत पंतप्रधान मोदींनी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या दरम्यान काही महत्वाचा निर्णय या बैठकीत होऊ शकतो. या घटनेने राज्यात आणखी पेच निर्माण झाला आहे.

एकीकडे राज्यात राज्यपाल राष्ट्रपती राजवटीची घोषणा करु शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत असताना आता भाजप सत्तास्थापनेचा दावा करु शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतू आवश्यक संख्याबळ भाजप कुठून जमा करणार असा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत.

Visit : Policenama.com 

 

Loading...
You might also like