राज्यसभेतील ‘NDA’च्या संख्याबळामुळं तिहेरी तलाकच्या विधेयकाचा मार्ग ‘सुकर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभेत मोठे यश मिळवल्यानंतर आता राज्यसभेत देखील NDA बहुमतात येताना दिसून येत आहे. अशा परिस्थितीत सरकारकडून मांडलेल्या विधेयकाला विरोधकांना राज्यसभेत अडवून ठेवता येणार नाही. तलाक विधेयकाला विरोध करण्यासाठी राज्यसभेत विरोधक मजबूत स्थितीमध्ये दिसून येत नाहीत. मोदी सरकार आपल्या सहकारी पक्षासोबत राज्यसभेत बहुमतापर्यंत पोहचले आहे. मोदी सरकारचे महत्वकांक्षी तलाक विधेयक राज्यसभेत पास होण्यासाठी कसलाही अडथळा येणार नाही.

मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात राज्यसभेत NDA ला बहुमत नसल्याने बरीच विधेयकं राज्यसभेत अडकून पडायची. यामध्ये तीन तलाक या सरकारच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या विधेयकाचा देखील समावेश होता.

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा जनता दल युनायटेड, अण्णा द्रविड मुनेत्र कळघम हे पक्ष भाजपसोबत आल्यामुळे राज्यसभेत NDA ची ताकद वाढली आहे. लोकसभेत AIADMK ला एकही जागा मिळाली नसली तरी राज्यसभेत या पक्षाचे १३ सदस्य आहेत. या १३ सदस्यांमुळे NDA ला राज्यसभेत बहुमत मिळाले आहे. जनता दल युनायटेडचे देखील राज्यसभेत ६ सदस्य आहेत.

TDP चे ४ आणि INLD चा एक राज्यसभा सदस्य भाजपसोबत

नुकतेच तेलगू देसम पक्षाचे ४ राज्यसभा सदस्य आणि इंडियन नॅशनल लोक दलाचा एक सदस्य भाजपमध्ये सामील झाले आहेत. या ५ सदस्यांमुळे भाजपचे राज्यसभेतील संख्याबळ ७५ झाले आहे. राज्यसभेचे सदस्य मदनलाल सैनी यांच्या मृत्यूमुळे भाजपचा एक राज्यसभेतील सदस्य कमी झाला आहे. याशिवाय गुजरामधून ५ जुलैला होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीत दोन जागेवर भाजपचे सदस्य निवडून येणार आहेत. त्यामुळे भाजपची राज्यसभेतील संख्या ७७ वर जाईल.

याशिवाय ४ अपक्ष राज्यसभा सदस्यांचा भाजपला पाठींबा आहे. तसेच तीन नेमलेले राज्यसभा सदस्य भाजपच्या बाजूने आहेत. यामुळे NDA ला राज्यसभेत ११५ जागा मिळून बहुमत मिळत आहे.

राज्यसभेत NDA चे संख्याबळ

भाजप : ७५ + ३ (Waiting)- ७८

AIADMK: १३

JDU: ६

LJP: १

शिवसेना: ३

अकाली दल: ३

सिक्किम डेमोक्रेटिक फ्रंट: १

बोडो पिपुल्स फ्रंट: १

RPI: `१

AGP: १

निर्दलीय: ४

नामांकित: ३

एकूण : ११५

या पक्षांचाही मिळू शकतो पाठींबा

बिजू जनता दल : ५

YSRC- २

TRS- ६

नगा पीपुल्स फ्रंट: १

एकूण : १४

म्हणजे NDA सोबत इतर सहयोगी पक्षांचा पाठींबा मिळाल्यास राज्यसभेतील संख्याबळ १२९ वर जाते. राज्यसभेत एकूण संख्या २४३ इतकी आहे.

तीन तलाक विधेयकाला जेडीयूचा विरोध

राज्यसभेत जेडीयू तीन तलाक विधेयकाला विरोध करत आहे. परंतु जेडीयूच्या विरोधाचा जास्त फरक पडणार नाही. या राज्यसभेतील संख्याबळामुळे राज्यसभेत आता काँग्रेसची ताकद कमकुवत झाली आहे. भाजपला कोणतेही विधेयक आता विनाअडथळा पास करता येणार आहे.

‘ही’ पेये प्यायल्यास वजन होईल कमी, शरीराला मिळेल ऊर्जा

 ‘वजन’ कमी करताना घाई करू नका, हळूहळू करा कमी

 ‘हे’ नैसर्गिक उपाय केल्यास घेता येईल गाढ झोप

 रक्तचाचणी द्वारे कळू शकते आयुर्मान आणि भविष्यातील आजार 
अल्पसंख्याकावर हल्ला म्हणजे संविधानावर हल्ला – हाफिज अ.गफार