home page top 1

‘आघाडी’चे शिवसेनेसोबत जाण्याचे संकेत ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपने कितीही फोडाफोडी केली, कितीही प्रयत्न केले तरी राज्यात भाजपचं सरकार येऊ शकत नाही असं वक्तव्य काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सिल्व्हर ओक येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी  केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आदी नेते उपस्थिती होते.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “विधानसभेत युतीला 200 पेक्षा जास्त जागा मिळण्याची अपेक्षा होती. परंतु तसे काही झाले नाही. गेल्या पंधरा दिवसांत त्यांनीही याची कबुली दिली आहे. सध्या राज्यातील शेतकरी पिचलेला आहे, अडचणीत आहे असे असतानाही सरकार सत्ता स्थापन करण्यात आणि एकमेकांवर टीका करण्यात व्यस्त आहे. भाजपने कितीही फोडाफोडीचं राजकारण केलं आणि कितीही प्रयत्न केले तरी राज्यात भाजपचं सरकार येऊ शकत नाही. आम्हाला घटनात्मक सरकार हवं आहे.”

राज्यात भाजपचे सरकार येऊ शकत नाही असे ठामपणे सांगत पृथ्वीराज चव्हाण यांनी आघाडीचे शिवसेनेसोबत जाण्याचे संकेत दिलेत का? याशिवाय काँग्रेसचाही शिवसेनेला पाठिंबा आहे असा याचा अर्थ होतो का ? असे सवाल उपस्थित होताना दिसत आहेत.

Visit : Policenama.com 

 

Loading...
You might also like