डॉ. भारती पवार यांचे संसदेत भाषण चालू असताना हसणाऱ्या खा.’मुंडे’, ‘खडसें’बाबत भाजप ‘गंभीर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभेत खासदार भारती पवार यांचे भाषण सुरु असताना त्यांच्या मागील बाकावर बसलेल्या खासदार प्रितम मुंडे आणि रक्षा खडसे हसत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकारानंतर या दोघींवर सोशल मिडियातून टीका करण्यात आली. आता या प्रकाराची सरकाराने गंभीर दखल घेतल्याचे समजते आहे. येणाऱ्या संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान मोदी दोघींचेही नाव न घेता आपण संसदेत कोणत्या कामासाठी येतो हे सुनवणार असल्याची शक्यता आहे.

यानंतर भाजप खासदार पवार यांना भाजप नेतृत्वाकडून झालेल्या प्रकाराची विचारणा करण्यात आली, मात्र त्यांनी देखील व्हिडिओ पाहिल्यावर आपल्याला कळाल्याचे सांगितले. त्यामुळे झालेल्या प्रकारबाबत दोघींकडे स्पष्टीकरण मागण्यात आले आहे. हा प्रकार विरोधकांनी जाणीवपूर्वक पसरवला, आपल्या हसण्याचा उद्देश पवार यांची चेष्ठा करण्याचा नव्हता असे दोघींकडून सांगण्यात आले आहे. मग कोणत्या कारणाने या दोघी हसत होत्या असा प्रश्न भाजप नेत्यांना पडला आहे.

बरोबर मागील वर्षी भाजपने रेणुका चौधरी यांच्या राज्यसभेत असण्यावरुन त्यांची तुलना रामायणातील राक्षसीणीशी केली होती. भाजप नेतृत्व ज्या काँग्रेसच्या घराणेशाहीला शिव्या घालते त्याच घराणेशाहीचे या दोघी प्रतिनिधीत्व करतात असे आरोप करण्यात येत आहे.

संसदीय बैठकीत पंतप्रधान मोदी कायमच खासदारांना उपस्थिती आणि वर्तनाबाबत सल्ले देत असतात. अमित शाह देखील खासदारांना इकडे तिकडे वेळ घालवण्यापेक्षा ग्रंथालयात जाऊन पुस्तके वाचण्याचा सल्ला देतात. परंतू जेव्हाच त्यांचेच खासदार हे असे वर्तन करतात तेव्हा आता भाजप नक्की काय निर्णय घेते हे पाहणे आवश्यक ठरेल.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like