Video : ‘जास्त बोलशील तर गोळी घालीन’, कार्यकर्त्याला रिव्हॉल्व्हर दाखवणाऱ्या BJP मंत्र्याचा व्हिडीओ व्हायरल !

भोपाळ : वृत्त संस्था – सध्या बिहार विधानसभा निवडणूक (Bihar Legislative Assembly election, 2020) आणि मध्य प्रदेशात होणाऱ्या पोटनिवडणुकीची (2020 Madhya Pradesh by-elections) जोरदार चर्चा आहे. अशातच आता एका भाजप उमेदवाराचा हातात रिव्हॉल्वर (Revolver) घेऊन कार्यकर्त्याला धमकावतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ खासगी चर्चा किंवा बैठकीतला असल्याचं दिसत आहे. यात मंत्रीवर असणारे भाजप नेते (BJP Leader) सर्रास शिव्या घालत खिशातून बंदूक काढताना दिसत आहे. हाच व्हिडीओ पुढं करत आता काँग्रेसनं (Congress) थेट भाजपवर निशाणा साधला आहे. काँग्रेस नेत्यांनी हा व्हिडीओ सोशलवर शेअर करत निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याचं जाहीर केलं आहे.

हा व्हिडीओ मध्य प्रदेश सरकारमध्ये मंत्री असणाऱ्या नेते बिसाहूलाल सिंह (Bisahulal Singh) यांचा असल्याचं सांगितलं जात आहे. हा व्हिडीओ गुपचूप मोबाईल कॅमेऱ्यात शुट करण्यात आलेला आहे. हा व्हिडीओ स्पष्ट नाही. परंतु यात बिसाहूलाल हे आपल्याच कार्यकर्त्यावर रिव्हॉल्वर उगारताना दिसत आहेत. जास्त बोलशील तर गोळी घालीन अशी थेट धमकी देतानाही येत एकू येत आहे. आता हाच व्हिडीओ काँग्रेसच्या हाती लागला आहे. त्यामुळं काँग्रेस आता भाजपविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याच्या पावित्र्यात आहे.

बिसाहूलाल हे एका कार्यकर्त्याला काही रक्कम आणण्यास सांगताना दिसत आहेत. जास्त बोललास तर गोळ्या घालीन अशी धमकीची भाषाही व्हिडीओत ऐकायला मिळत आहे. अद्याप तरी या व्हिडीओची शहानिशा झालेली नाही. तरी काँग्रेसनं मात्र हा व्हिडीओ शेअर केला आहे.

बिसाहूलाल सध्या शिवराज सिंह सरकारमध्ये आहेत. याशिवाय पोटनिवडणुकीतही ते उभे आहेत अनुपपूरची जागा ते भाजपच्या तिकीटावर लढवत आहेत.

काँग्रेस उमेदवाराच्या पत्नीबद्दल यापूर्वीही बिसाहूलाल हे अशाच प्रकारे अर्वाच्च भाषेत बोलले होते. त्याविरोधातही काँग्रेसकडून त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी (Kamal Nath) यात आता लक्ष घातलं आहे. भाजप बंदुकीच्या जोरावर निवडणूक लढत आहे काय ? कार्यकर्ते आणि मतदारांना कशा प्रकारे धमकावण्यात येत आहे हे या व्हिडीओमधून समोर येत आहे असं कमलनाथ यांनी सांगितलं आहे.

You might also like