…तर मोदींसमोरच आत्महत्या करेन ; भाजप उमेदवाराची धमकी

शिलाँग : वृत्तसंस्था – मेघालयातील शिलाँग लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार सनबोर शुल्लाई नरेंद्र मोदींच्या समोरच आत्महत्या करेन, असे म्हंटले आहे. घुसखोरांना देशाबाहेर काढण्यासाठी नागरिकत्व (सुधारणा) विधेयक लागू करण्याचे आश्वासन देत भाजप लोकसभा निवडणूक लढवत आहे, तर याच विधेयकाला भाजपचे उमेदवार सनबोर शुल्लाई यांनी विरोध दर्शवत जीव देण्याची धमकी दिली आहे.

घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी नागरिकत्व (सुधारणा) विधेयक लागू करणार असल्याचं आश्वासन भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी गुरुवारी दिले. त्याला भाजपच्याच सनबोर शुल्लाई यांनी विरोध दर्शवला आहे. सनबोर शुल्लाई म्हणाले की, ‘जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत या विधेयकाला विरोध असेल. त्यासाठी मी जीव सुद्धा देईल. नरेंद्र मोदींच्या समोरच आत्महत्या करेन. ‘

नागरिकत्व सुधारणा विधेयक म्हणजे काय –

१९९५ नागरिकत्व कायद्यात सुधारणा करुन बांग्लादेश, पाकिस्तान आणि अफगानिस्तान या शेजारच्या देशातून भारतात आलेल्या निर्वासितांना भारतीय नागरिकत्व देण्यात येईल. अर्थात या निर्वासितामध्ये हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी, ख्रिश्चन यांचाच समावेश असून यामध्ये मुस्लीमांचा समावेश नाही. भारतीय नागरिक होण्यासाठी ११ वर्ष भारतात वास्तव्यास असाव लागतं असा नियम आहे. मात्र, या विधेयकानुसार भारतातील शेजारी देशातील या समुहांपैकी व्यक्तीचे सहा वर्षाहून अधिक काळ वास्तव्य असेल तर त्या व्यक्तीला नागरिकत्व दिलं जाईल. २०१४ भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात हे विधेयक मंजूर करु असं म्हटलं होत आणि त्यानंतर सत्ताधारी भाजपाने लोकसभेत हे विधेयक आणलं आणि मंजूर करुन घेतलं.

ईशान्य भारतातून बिलाला विरोध होण्याचे कारण –

जर हे नागरिकत्व विधेयक मंजूर झालं तर ईशान्य भारतातील स्थानिक लोकांच्या सांस्कृतिक अस्मितेला धक्का पोहोचेल. अशी भीती व्यक्त करत अनेक संघटना या विधेयकाला विरोध करत आहेत. जर हे विधेयक मंजूर झालं तर बांग्लादेशामधून आलेल्या निर्वासित हिंदू संख्या वाढले आणि स्थानिकांची संख्या कमी होईल. अशी भीती ईशान्य भारतातील नागरिकांना वाटत आहे.