चिंचवड मतदारसंघातील भाजप उमेदवार लक्ष्मण जगतापांना देवांग कोष्टी सामजाचा पाठिंबा

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – चिंचवड शहरातील देवांग कोष्टी समाजाने चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

पुणे व पिंपरी-चिंचवड परिसर देवांग कोष्टी समाज संघटनेचे अध्यक्ष सुरेश तावरे यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांना पाठिंब्याचे पत्र दिले. यावेळी संघटनेचे खजिनदार भगवानराव गोडसे, उपाध्यक्ष दत्ता लिपारे, सचिव सुनिल ढगे, अशोकराव भुते, सुनिल डहाके, भरत आमणे, प्रमोद भागवत, सतीश लिपारे, निलेश जगताप, दत्ता ढगे, अमोल तावरे आदी उपस्थित होते.

आमदार लक्ष्मण जगताप यांनी चिंचवड मतदारसंघाचा कायापालट केला आहे. ते कर्तव्यनिष्ठ आमदार आहेत. मतदारसंघाचा विकास व्हावा यासाठी ते सतत काम करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वात विकासशील मतदारसंघ म्हणून चिंचवड मतदारसंघाची ओळख निर्माण झाली आहे. या मतदारसंघात देवांग कोष्टी समाजाची मोठी संख्या आहे. मतदारसंघाच्या शास्वत विकासासाठी समाजाने आमदार जगताप यांना निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सुरेश तावरे यांनी सांगितले.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी