भाजपाच्या पहिल्या यादीत ‘या’ 7 आयात उमेदवारांनाही संधी, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपाच्या 125 उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर करण्यात आली. या पहिल्या यादीमध्ये विद्यमान 12 आमदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे. तर राधाकृष्ण विखे-पाटील, हर्षवर्धन पाटील, शिवेंद्रसिंह राजे भोसले, वैभव पिचड, राणा जगजितसिंह, रमेश आडस्कर आणि संदीप नाईक या आयात उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. नवी दिल्लीत भाजपाच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत भाजपा नेते अरुण सिंह यांनी ही घोषणा केली.

विधानसभा निवडणुकीच्या तोडांवर भाजपमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून अनेक दिग्गज नेत्यांची जोरदार इनकमिंग झाली. त्यातील काही उमेदवारांना भाजपाच्या पहिल्या संधी दिली आहे. त्यात शिर्डीमधून राधाकृष्ण विखे-पाटील, इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील, साताऱ्यात शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि ऐरोलीतून संदीप नाईक यांचा समावेश आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस, शिवसेना परत काँग्रेस आणि आता भाजप असे पक्षांतर केले आहे. शिर्डी विधानसभा मतदारसंघ राधाकृष्ण विखे-पाटील यांचा बालेकिल्ला मानला जातो. 1995 पासून आतापर्यंत विखे-पाटील यांनी शिर्डी विधानसभा मतदारसंघातून विजय मिळाला आहे.

जागावाटपाविषयी राष्ट्रवादी काँग्रेससोबत असलेल्या मतभेदांमुळे हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हर्षवर्धन पाटील यांनी 3 वेळा अपक्ष म्हणून निवडून येण्याचा विक्रम केला आहे. त्यांनी एकूण 6 मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम केले आहे. इंदापूर विधानसभा मतदारसंघातून पाटील यांनी सलग 4 वेळा आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. मुख्यमंत्री मनोहर जोशी व उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या युती शासनात त्यांनी 5 वर्ष आणि त्यानंतर आघाडी शासनात 14 वर्षे मंत्री म्हणून काम पाहिले आहे.

भाजपमध्ये उमेदवारीवरुन शिवेंद्रसिंहराजे यांना दीपक पवार यांनी विरोध केला होता. दीपक पवारांनी साताऱ्यात मेळावा घेऊन “शिवेंद्रराजे हटाव, भाजप बचाव’ असा नारादेखील दिला होता. राष्ट्रवादीमधून भाजपामध्ये प्रवेश केलेल्या शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना सातारा-जावळी मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केलेल्या संदीप नाईक मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपाचे विद्यमान आमदार नरेंद्र पवार यांचा पत्ता कट झाला आहे. भाजपाने ऐरोली मतदारसंघाच्या मोबदल्यात शिवसेनेसाठी कल्याण पश्चिम मतदारसंघ सोडला आहे.

भाजपाच्या 125 उमेदवारांच्या पहिल्या यादीत 52 विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. यामध्ये 12 महिला आमदारांचा समावेश आहे. 12 मतदारसंघांची आदलाबदल करण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले. पुण्यातील आठही जागा भाजपाच्या वाटेला तर मुंबईतील 19 जागा या शिवसेनेच्या वाट्याला आल्या आहेत.

Visit : Policenama.com