भाजप नेत्यानेच वाढवली नितेश राणेंची ‘डोकेदुखी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कणकवली विधानसभा मतदारसंघातून भाजपाने माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेने राणेंची कोंडी करण्यासाठी या मतदार संघातून उमेदवार दिल्यामुळे राणे यांची अडचण वाढली असतानाच त्यात आता आणखी भर पडली आहे. नितेश राणे यांच्याविरोधात भाजपचे बंडखोर उमेदवार संदेश पारकर यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

संदेश पारकर यांनी शिवसेना खासदार विनायक राऊत यांची भेट घेऊन शिवसेना उमेदवार सतिश सावंत यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे आता नितेश राणे यांच्या विरोधात शिवसेनेची ताकद वाढली आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी नारायण राणेंचे पुत्र निलेश राणेंचा पराभव केला होता.

राज्यात भाजप शिवसेनेची जरी युती झाली असली तरी कणकवली विधानसभा मतदारसंघात ते आमनेसामने आले आहेत. कणकवली विधानसभा मतदारसंघातून भाजपाने माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे यांना उमेदवारी दिली आहे. तर शिवसेनेने सतीश सावंत यांना उमेदवारी दिली आहे. नारायण राणे यांचे अत्यंत निकटवर्ती सहकारी मानले जाणाऱ्या सतीश सावंत यांनी नुकताच स्वाभिमान पक्षाचा राजीनामा दिला आहे. राणेंची कोंडी करण्यासाठी शिवसेनेने सतीश सावंत यांना उमेदवारी दिली आहे.

Visit : Policenama.com