काय सांगता ! होय, कोटयाधीश उदयनराजेंवर 1 कोटी 82 लाखाचं कर्ज, संपत्तीत 5 महिन्यात दीड कोटींची वाढ

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम करत भाजपमध्ये दाखल झालेल्या उदयनराजे भोसले यांनी लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी कंबर कसली आहे. राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आलेल्या उदयनराजे यांनी राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता पोटनिवडणुकीसाठी त्यांनी उमेदवारी अर्ज भरताना आपल्या संपत्तीची घोषणा केली आहे. यानुसार त्यांच्या संपत्तीमध्ये पाच महिन्यात दीड कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीनिवास पाटील यांच्यात थेट लढत होत आहे. उदयनराजे भोसले यांनी शपथपत्रात दिलेल्या माहितीनुसार,त्यांच्याकडे 40 किलो सोन्याचे आहि हिऱ्यांचे दागिने आहेत. मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले यांच्याकडे 13 कोटी 81 लाखांची जंगम मालमत्ता होती. त्यात आता वाढ होऊन ती 14 कोटी 44 लाख रुपये झाली आहे.

त्याचबरोबर उदयनराजे यांच्याकडे ऑडी, मर्सिडीज बेन्झ, इण्डेवर यांसारख्या गाड्या देखील आहेत. त्याचबरोबर त्यांच्याकडे 185 कोटी रुपयाची स्थावर मालमत्ता देखील आहे. त्यांच्यावर 1 कोटी 82 लाख रुपयांचे वाहन कर्ज देखील आहे.

तर उदयनराजे यांच्या विरुद्ध उभे असलेल्या श्रीनिवास पाटील यांच्याकडे 10 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता असून 11 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. पाटील यांचा शेती हा मुख्य व्यवसाय असल्याचे म्हटले आहे. विविध बँकांमध्ये त्याच्या आणि कुटुंबियांच्या नावाने ठेवी असून मुंबईमध्ये आदर्श गृहनिर्माण सोसायटीला 60 लाख रुपयांचे कर्ज दिल्याची माहिती त्यांनी शपथपत्रात दिली आहे.

Visit : Policenama.com 

You might also like