राफेलच्या चौकशीची मागणी भाजप टाळू शकत नाही : शरद पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

टू जी गैरव्यवहाराच्या चौकशीच्या मागणीसाठी संसदेचे कामकाज बंद पाडणाऱ्या भाजपला राफेल विमान खरेदीच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती नेमण्याची विरोधकांची मागणी टाळता येणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’cf80ddd0-ce98-11e8-b1a2-69d9b821216b’]

शरद पवार म्हणाले, बोफोर्सवरून भाजपने आकाश पाताळ एक केले होते. टू जी गैरव्यवहाराच्या चौकशीसाठीही भाजपने आक्रमक भूमिका घेतली होती. संसदेचे संपूर्ण अधिवेशन बंद पाडले होते. यामुळे राफेल विमान खरेदीबाबत झालेल्या आरोपप्रकरणी चौकशीची मागणी सत्ताधाऱ्यांना मान्य करावीच लागेल. राफेल विमान खरेदीबाबत आरोप होत असतानाच संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन फ्रान्सच्या दौऱ्यावर गेल्याबद्दलही आश्चर्य वाटते. राफेल विमाने चांगलीच आहेत, त्याबद्दल दुमत नाही. फक्त खरेदीच्या किमतीबाबत काही आक्षेप आहेत. याबद्दल लोकांच्या मनात संशय निर्माण झाला आहे. तो सरकारला दूर करावा लागेल. अन्यथा त्यात काहीतरी काळेबेरे असल्याचा संशय निर्माण होऊ शकतो, असे पवार म्हणाले.

म्हाडाच्या घरांच्या किमती 25 ते 30 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय ?

भारिप बहुजन महासंघ आणि एमअयएमच्या आघाडीबाबत प्रतिक्रिया देताना पवार म्हणाले, प्रकाश आंबेडकर आणि एमआयएम एकत्र आले तरीही त्याचा राज्यात फारसा परिणाम होणार नाही. कारण मुस्लीम समाज हा विचारपूर्वक मतदान करतो. तर मतदान यंत्राच्या वादाबाबत पवार म्हणाले, मतदान यंत्रांबाबत विरोधी पक्षांनी काही आक्षेप नोंदविले आहेत. पुन्हा पारंपरिक मतदान पद्धत अमलात आणावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या संदर्भात १५ दिवसांमध्ये विरोधी पक्षनेत्यांची बैठक होत आहे. या बैठकीत पुढील निर्णय घेतला जाईल. मतदान यंत्रांच्या मुद्द्यावर मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सर्व पक्षांच्या नेत्यांना पत्र पाठवून निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे. परंतु, बहिष्काराचे अस्त्र कोणालाही मान्य होणार नाही, असेही पवार म्हणाले.

[amazon_link asins=’B00NTZL8CM’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d848a42d-ce98-11e8-a5d5-1bc78d760856′]

दरम्यान, राफेल प्रकरणावरून शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपला लक्ष्य केले आहे. राफेल प्रकरणात लपवण्यासारखे आता काहीच उरले नाही. जे लपवायचे होते त्या अवास्तव वाढवलेल्या किमतीचाच भांडाफोड झाला. आधी फ्रान्सचे माजी राष्ट्रपती ओलांद यांनी एका गालावर मारली व आता फ्रान्सच्या मीडियाने दुसऱ्या गालावर सणसणीतपणे मारली. अशा शब्दांमध्ये शिवसेनेने राफेल विमान खरेदी प्रकरणावरुन भाजपाला लक्ष्य केले आहे. सामना या मुखपत्रातील अग्रलेखातून राफेल प्रकरणात आधीच अडचणीत सापडलेल्या भाजपाला आणखी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला आहे.