. . तर मातोश्रीवर कॅमेरे लागतील, चंद्रकांत पाटील यांचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन – ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारावरून सध्या राजकीय वर्तुळात चांगल्याच चर्चा आहेत. सध्या शिवसेनेकडे असलेले गृहमंत्रीपद हे राष्ट्रवादीकडे दिले जाणार असल्याच्या देखील चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरून शिवसेनेवर चांगलाच निशाणा साधला आहे.

शिवसेनेने त्याच्याकडे असलेले गृहमंत्रीपद जर राष्ट्रवादी काँग्रेसकडे दिले तर मातोश्रीवर कॅमेरे लागतील असा खोचक टोला भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे तसेच अर्थखाते, महसूल विभाग आणि गृहखाते अशी सगळीच खाती शिवसेनेने वाटली तर ते स्वतःकडे काय ठेवणार ? मुख्यमंत्रीपद ? असा सवाल देखील पाटील यांनी यावेळी केला आहे.

30 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. सोमवारी दुपारी 12 ते एकच्या सुमारास 36 आमदार आपल्या मंत्री पदाची शपत घेणार आहेत. तब्बल एक महिन्यानंतर ठाकरे मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मुहूर्त सापडला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाष्य केले होते.

काय म्हणाले नेमकं संजय राऊत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत
मंत्रिमंडळाचा विस्तार 30 तारखेला होणार असून त्यात बदल होणार नाही. खातेवाटपाचे अधिकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आहेत. त्यांनी दोन्ही पक्षांच्या प्रमुखांशी चर्चा केली असून कोणामुळेही विस्तार रखडलेला नाही असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले होते आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/