…म्हणून अजित पवार यांच्यावरही Phd करायचीय

पोलिसनामा ऑनलाईन टीम – राष्ट्रवादीचे पक्षध्यक्ष शरद पवार यांच्यावर पीएचडी करण्याचा मानस असलेले भारतीय जनता पक्षाचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आता अजित पवारांचे तोंडभरून कौतुक केले आहे. अजित पवारांचे व्यक्तिमत्व कमाल असून त्यांच्यावरही पीएचडी करण्याची इच्छा असल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नमूद केले आहे.

त्याचपमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्याप्रमाणे व्हिजन नाही अशी टीकाही त्यांनी केली. एका वृत्तसमूहाच्या मुलाखतीत त्यांनी अनेक प्रश्नांवर दिलखुलास उत्तरे दिली. पाटील यांनी काही दिवसांपुर्वी शरद पवारांवर पीएचडी करण्याचे बोलून दाखविले होते. ते काम चालू असताना आता अजितदादांवर पीएचडी करावीशी वाटू लागली आहे. सरकार असतानाही ते उपमुख्यमंत्री, त्यांचं सरकार असतानाही उपमुख्यमंत्री होते.

सिंचन घोटाळा केला तरी काही झाले नाही, शेतकर्‍यांना वाईट बोलले तरी काही नाही. कधी चिडून राजीनामा देतात. पण इतके सगळे केल्यानंतरही ते मध्यवर्ती आहेत. अशा शब्दात पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पिरकी घेतली. तसेच उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडून मला मुख्यमंत्र्यांनी रजिस्ट्रर सावकारी आणि सावकारी यामधील फरक सांगावा असे आव्हान दिले. महाविकास आघाडी सरकारचे 100 दिवस ताळमेळ नसणारे आहेत. कोणताही संवाद त्यांच्यात नाही. नवीन निर्णय घेण्याची हिंमत नाही. जी कामं आम्ही केली तीच कामं पुढे रेटली. 100 दिवसांत भाजपाच्या आंदोलनाला हे सरकार घाबरलं. काहीही नवीन कऱण्याचं व्हिजन नसणारं हे सरकार आहे.