तुमचा आमचा ‘पंगा’ पक्ष म्हणून, तुम्ही ‘वंशजा’पर्यंत कुठे पोहोचलात ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मागील काही दिवसांपासून माजी खासदार उदयनराजे भोसले आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात छत्रपती शिवाजी महाराज या विषयावरून चांगलीच जुगलबंदी रंगल्याचं पहायला मिळत आहे. ‘आज के शिवाजी -नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. पुस्तक मागे घेतले असले तरी वाद मात्र मिटण्याचे नाव घेत नाही. हा वाद आता व्यक्तिगत वादावरून पक्षांतील वाद होतो आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. “संजय राऊत तुम्ही थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजापर्यंत कुठे पोहोचलात. त्यामुळे महाराष्ट्रात भीषण स्थिती निर्माण झाली आहे” असे ते म्हणाले. पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते.

यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले ,”संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचा मी निषेध करतो. उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असल्याचे पुरावे द्यावेत असं संजय राऊत म्हणाले आहेत. मात्र, ते चुकून बोलले की त्यांना भ्रम होत आहे, हे कळत नाही. तुमचा आमचा जो पंगा आहे, तो पक्ष म्हणून चालू द्या. थेट तुम्ही शिवाजी महाराज यांच्या वंशजापर्यंत कुठे पोहचलात. त्यामुळे अतिशय भीषण स्थिती महाराष्ट्रात आलेली आहे. कोण काय बोलतय, काय अर्थ होत आहेत. जे आम्ही बोलत आहोत त्याचा चुकीचा अर्थ लावला जात आहे. असे ते म्हणाले.”

यावेळी बोलताना पाटील म्हणाले की , “दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला याला भेटण्यासाठी मुंबईत येत होत्या असं राऊत यांनी म्हटलं होतं त्या वक्तव्याची चौकशी झाली पाहिजे.”

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/