‘चिखलफेक’ प्रकरणी नितेश राणेंवर ‘खुनाचा प्रयत्न’ हे कलम लावण्याचे आदेश, राजकीय क्षेत्रात खळबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गोवा हायवेचे अभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर आमदार नितेश राणे यांनी चिखल फेक करत त्यांना खांबाला बांधण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यानंतर नितेश राणेंना पोलीस कोठडीत पाठवण्यात आले होते. या चिखल फेकीवर कोल्हापूरात संतप्त वातावरण दिसून आले. कोल्हापूरातील करंबळी या गावातील शेडेकर यांच्या नातेवाईकांनी नितेश राणेंचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला होता. त्यांनंतर आता महसुल मंत्री चंद्रकांत पाटील यांची एक व्हीडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे. हा व्हीडिओ आगीत तेल टाकण्याचे काम करू शकतो.

नितेश राणे यांनी ज्या अभियंत्याला मारहाण केली त्याच्या कुटुंबाला चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या भेटीवेळीचा हा व्हिडिओ आहे. अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी नितेश राणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर खुनाचा प्रयत्न केलाचा कलम लावण्याचे आदेश मी दिले आहेत, असं चंद्रकांत पाटील अभियंत्याच्या कुटुंबाला सांगत आहेत. या ध्वीनीचित्रफितीमुळे हे प्रकरण आणखीनच चिघळणार असल्याचं दिसत आहे.

चंद्रकांत पाटलांनी घेतलेल्या भूमिकेवर भाजपच्याच कार्यकर्त्यांनी त्यांना घरचा आहेर दिला आहे. सिंधुदुर्गमधील भाजपने नितेश राणे यांनी केलेल्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. चंद्रकांत पाटलांनी अभियंता शेडेकर यांच्या कुटुंबाची भेट घेत सरकार त्यांच्यासोबत असल्याचे सांगितले होते. त्यावर सिंधुदुर्गमधील भाजप नेत्यांनी, तुम्ही आधी महामार्गाच्या दुरावस्थेची पाहणी करा, अशी मागणी चंद्रकांत पाटलांना केली होती.

दरम्यान, सध्या गोवा हायवेचं चौपदरीकरणाचं काम सुरू आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होते, तसंच अनेक ठिकाणी रस्ता खचल्याचे समोर आले होते. त्यानंतर गुरूवार ४ जुलै रोजी नितेश राणे यांनी अभियंता प्रकाश शेडेकर यांची भेट घेत सर्विस रोड का नाही बांधला? गोव्यामध्ये सर्विस रोड होतो मग कणकवलीत का नाही? असे सवाल केले. यावेळी नितेश राणेंसह त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रकाश शेडेकर यांच्या अंगावर चिखल फेक करत त्यांना खांबाला बांधण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात नितेश राणे आणि त्यांच्या जवळपास ५० समर्थकांवर कलम ३५३, ३४२, ३३२, ३२४, ३२३, १२०(अ), १४७, १४३, ५०४, ५०६ या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज दुपारी ३ वाजता त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने सर्व आरोपींना ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

‘या’ गोष्टींचे सेवन करणाऱ्या महिलांना कधीही होत नाही ‘ब्रेस्ट कॅन्सर’

रोज सकाळी ‘मनुक्यांचे पाणी’ प्या आणि मिळवा ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

रक्ताचा अभाव, कॅन्सरसारख्या गंभीर आजारांवर ‘पांढरा कांदा’ उपयोगी

सावधान ! ‘गहू’ आरोग्यासाठी नुकसानकारक

उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी ७ उपाय

‘तळहात’ पाहून सुद्धा ओळखू शकता, तुम्हाला आहे कोणता आजार ?

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like