चंद्रकांत पाटलांच्या ‘या’ दाव्यानं प्रचंड खळबळ, म्हणाले…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात महाशिवआघाडीबाबत जोरदार चर्चा आणि बैठका सुरु असताना भाजपला मात्र पुन्हा सत्तेचे डोहाळे लागताना दिसत आहेत. भाजपशिवाय सत्ता स्थापन होणे शक्य नसल्याचे आम्हाला मुख्यमंत्र्यांनी सांगितले असल्याचे वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. भाजपने घेतलेल्या सर्व आमदारांच्या बैठकीनंतर चंद्रकांत पाटील पत्रकार परिषदेदरम्यान बोलत होते.

सध्या भाजप सर्वात मोठा पक्ष आहे, भाजपचे एकूण संख्याबळ 105 आहे. त्यात 14 अपक्ष सहयोगी झाल्यामुळे एकूण 119 आमदार भाजपकडे आहेत असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

म्हणून भाजप राज्यातील मोठा पक्ष
भाजपने 164 जागा लढल्यानंतर 105 जागांवर विजय मिळवला आहे. यामध्ये महिला आमदारांची संख्या जास्त असल्याचंही पाटील यांनी म्हटलं. दरम्यान, ज्या ठिकाणी भाजपने जागा हरल्या त्या 59 जागांपैकी 55 जागांवर भाजप नंबर 2 वर आहे. 26 आयारामांपैकी 16 विजयी झाले. त्यामुळे या सगळ्यात भाजप हाच महाराष्ट्रातला मोठा पक्ष आहे.

भाजपच्या कालपासून तीन बैठका झाल्या यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी भाजप मोठा पक्ष असल्याने आपली सत्ता येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. या बैठकीत राज्यातल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान यावरही चर्चा करण्यात आली. तसेच शेतकऱ्यांना तेवीस हजारांपर्यंतचे विमा कव्हरेज देणार असल्याचे देखील पाटील यांनी सांगितले.

राहुल गांधी माफी मागो, आंदोलनाला होणार सुरुवात
राफेल प्रकरणाबाबत केलेल्या वक्तव्यावरून राहुल गांधी यांनी न्यायालयात माफी मागितली. परंतु त्यांनी देशाची माफी मागावी यासाठी भाजपकडून ‘राहुल गांधी माफी मांगो’ हे आंदोलन लवकरच सुरु केले जाणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

Visit : Policenama.com